धोत्रे गावातील १४ वर्षीय मुलगी कोरोनाबाधित; महिला डॉक्टरच्या संपर्कातील १५ अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 11:30 AM2020-06-07T11:30:44+5:302020-06-07T11:31:16+5:30

धोत्रे येथील १४ वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर कोपरगाव येथील डॉक्टर महिलेच्या संपर्कातील १५ व्यक्तीचे व धोत्रे येथील एक असे एकूण १६ अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. संतोष विधाते व ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौदर यांनी दिली.

14-year-old girl from Dhotre village coronated; 15 reports of contact with a female doctor are negative | धोत्रे गावातील १४ वर्षीय मुलगी कोरोनाबाधित; महिला डॉक्टरच्या संपर्कातील १५ अहवाल निगेटिव्ह

धोत्रे गावातील १४ वर्षीय मुलगी कोरोनाबाधित; महिला डॉक्टरच्या संपर्कातील १५ अहवाल निगेटिव्ह

कोपरगाव : येथील कोरोनाबाधित डॉक्टर महिलेच्या संपर्कातील १५ व्यक्तींचे व तालुक्यातील धोत्रे येथे ठाण्याहून आलेल्या २ मुलीचे असे एकूण १७ स्त्राव तपासणीसाठी  शनिवारी पाठविण्यात आले होते. सर्वच १७ अहवाल रविवारी प्राप्त झाले असून धोत्रे येथील १४ वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर डॉक्टर महिलेच्या संपर्कातील १५ व्यक्तीचे व धोत्रे येथील एक असे एकूण १६ अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. संतोष विधाते व ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौदर यांनी दिली.

कोरोनाबाधित झालेली मुलगी मागील आठवड्यात ठाणे येथून आपल्या बहिणीसह आजोबा सोबत धोत्रे येथे आली होती. त्यांना गावातील शाळेत संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र ठाणे येथे या मुलींचे वडील कोरोना बाधित झाल्याने प्रशासनाने तत्काळ या मुलींना कोपरगाव येथील कोरोना केअर सेंटरमध्ये हलविले होते. त्यातील एका मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

तर कोपरगाव येथील महिला डॉक्टरच्या संपर्कातील अहवाल निगेटिव्ह आल्याने कोपरगावकरांचा जीव भांड्यात पडला आहे. 

दरम्यान प्रशानाकडून धोत्रे येथील काही परिसर सील करण्यात येणार असल्याचे डॉ.संतोष विधाते यांनी सांगितले. 

Web Title: 14-year-old girl from Dhotre village coronated; 15 reports of contact with a female doctor are negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.