पाथर्डीत लॉजमधून दीड लाखांची दारू जप्त
By Admin | Published: April 8, 2017 03:07 PM2017-04-08T15:07:59+5:302017-04-08T15:07:59+5:30
शहरातील महामार्गालगत बस स्थानक परिसरातील कैलास लॉजवर छापा टाकून १ लाख, ६४ हजारांची देशी, विदेशी दारु जप्त करण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
पाथर्डी (अहमदनगर), दि़ ८-
शहरातील महामार्गालगत बस स्थानक परिसरातील कैलास लॉजवर छापा टाकून १ लाख, ६४ हजारांची देशी, विदेशी दारु जप्त करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळीे सातच्या सुमारास पाथर्डी पोलिसांनी ही कारवाई केली.
न्यायालयीन इमारतीनजीक असलेल्या लॉजवरील दारुसाठ्याविषयी पाथर्डी पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेवाळे, सहाय्यक फौजदार गोर्डे, सहाय्यक फौजदार सुपारे, पोलीस हवालदार राजेंद्र पुंड, पो.कॉ शेंडे, पो.कॉ सानप, पो.कॉ घुगे, पो.कॉ शिंदे, पो.कॉ पठाण यांच्या पथकाने छापा टाकला. लॉजवरील व्यवस्थापक शहाराम रखमाजी बालवे (रा. बालवेवस्ती) यांच्याकडे पोलिसांनी विचारणा केली असता त्याने ग्राहकांना चोरून विक्री करण्यासाठी लॉजच्या तळमजल्यातील खोलीत दडवून ठेवलेला देशी, विदेशी दारूचा साठा दाखविला. त्यानंतर पोलिसांनी लॉज व्यवस्थापकास अटक करुन मोटारसायकल, मोबाईल असा एक लाख चौसष्ठ हजार, आठशे बासष्ठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी हा दारूसाठा सील करून दारूचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. याबाबत पोलीस शिपाई अच्चुत चव्हाण यांनी मुंबई दारूबंदी अधिनियम कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा नोंदविला. पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतले होते. परंतु एकाचविरुध्द गुन्हा दाखल केला.