नेवाश्यात १५ नवे कोरोना पॉझिटव्ह; रुग्ण संख्या २६४ वर..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 11:39 AM2020-08-05T11:39:18+5:302020-08-05T11:39:44+5:30
नेवासा येथील कोविड केअर सेंटरमध्ये मंगळवारी (४ आॅगस्ट) रॅपिड अँटिजेन टेस्ट व खासगी प्रयोगशाळेच्या अहवालात शहरातील ९ व्यक्तीसह तालुक्यातील १५ रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत.
नेवासा : नेवासा येथील कोविड केअर सेंटरमध्ये मंगळवारी (४ आॅगस्ट) रॅपिड अँटिजेन टेस्ट व खासगी प्रयोगशाळेच्या अहवालात शहरातील ९ व्यक्तीसह तालुक्यातील १५ रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत.
मंगळवारी नेवासा येथील कोविड केअर सेंटर येथे ९० व्यक्तींच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये नेवासा शहरातील नऊ, सोनई दोन, नेवासा बुद्रुक येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ७८ व्यक्तींच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या टेस्टमध्ये माळीचिंचोरे, मांडेगव्हाण व चांदा येथील प्रत्येकी एक व्यक्ती पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती तहसीलदार रूपेश सुराणा यांनी दिली.
नेवासा तालुक्यातील रुग्ण संख्या २६४ वर गेली आहे. तर १८ व्यक्तींना डिस्चार्ज दिल्याने १४४ रुग्ण आत्तापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेर. सध्या ११४ रुग्ण उपचार घेत आहेत, असेही सुराणा यांनी सांगितले.