वाळू उपसा करणाऱ्या १५ बोटी उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:22 AM2021-03-10T04:22:37+5:302021-03-10T04:22:37+5:30
४५ बोटींद्वारे घोड नदीपात्रात वाळू तस्करांकडून बेकायदा वाळू उपसा सुरु केला होता. तहसीलदार प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ...
४५ बोटींद्वारे घोड नदीपात्रात वाळू तस्करांकडून बेकायदा वाळू उपसा सुरु केला होता. तहसीलदार प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी रात्री महसूल व पोलिसांच्या संयुक्त पथकाने सलग १५ तास कारवाई केली. यात सुमारे अडीच कोटीच्या बोटी उद्ध्वस्त केल्या.
राहुरी तालुक्यातील एका ठेकेदाराने वडगाव शिंदोडी शिवारात वाळू मिस्त्रीत माती उपशासाठी दोन हेक्टर जागेसाठी लिलाव घेतला होता. पण वाळू तस्करांनी लिलावाच्या नावाखाली वाळू उपसण्याचा बेकायदेशीरपणे सपाटा लावला होता. ग्रामस्थांनी तक्रारी करुन वाळू तस्कर मोजत नव्हते. त्यावर तहसीलदार प्रदीप पवार यांच्याकडे ग्रामस्थांनी तक्रार केली होती. सोमवारी रात्री बेलवंडी पोलिसांना बरोबर घेऊन १५ बोटी स्फोट करून उद्ध्वस्त केल्या. मात्र १५ बोटी पुणे जिल्ह्याच्या हद्दीत अंधाराचा फायदा घेऊन पळून गेल्या. या पथकात मंडळ अधिकारी भरत चौधरी, प्रशांत कांबळे, शरद झावरे, अव्वल कारकून तलाठी सामील झाले होते.
....म्हसे व वडगाव शिंदोडी शिवारात सर्व म्हणजे १५ बोटी उद्ध्वस्त केल्या. पुणे जिल्ह्याच्या हद्दीत आम्ही कारवाई केली नाही. तिकडे बोटी होत्या की नाही हे अंधारात दिसले नाही. यापुढे बेकायदा गौण खनिज उपसा विरोधात तक्रार आली की लगेच कारवाई करणार आहे.
-प्रदीप पवार, तहसीलदार, श्रीगोंदा