सभासदांच्या विश्वासातूनच ठेवी १५५ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:20 AM2021-03-28T04:20:41+5:302021-03-28T04:20:41+5:30

निघोज : सभासदांनी निघोज नागरी पतसंस्थेचे संस्थापक स्व. बाबासाहेब कवाद यांच्यासारखाच माझ्यावर व संचालक मंडळावर विश्वास ठेवला. त्यामुळे आजअखेर ...

155 crore from the trust of the members | सभासदांच्या विश्वासातूनच ठेवी १५५ कोटींवर

सभासदांच्या विश्वासातूनच ठेवी १५५ कोटींवर

निघोज : सभासदांनी निघोज नागरी पतसंस्थेचे संस्थापक स्व. बाबासाहेब कवाद यांच्यासारखाच माझ्यावर व संचालक मंडळावर विश्वास ठेवला. त्यामुळे आजअखेर संस्थेच्या १५५ कोटींच्या ठेवी झाल्या असून १०० कोटींचे कर्ज वाटप झाले आहे, अशी माहिती अध्यक्ष वसंतराव कवाद यांनी दिली.

पारनेर तालुक्यातील निघोज नागरी सहकारी पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी ऑनलाइन पार पडली. यावेळी ते बोलत होते. उपाध्यक्ष नामदेव थोरात, कन्हय्या उद्योग समूहाचे संस्थापक शांताराम लंके, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर, माजी सरपंच चंद्रकांत लामखडे, ठकाराम लंके, राजाराम कवाद, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय लंके, सर्व संचालक मंडळ, कर्मचारी आदींनी ऑनलाइन सभेत सहभाग घेतला.

दत्तात्रय लंके यांनी ठेवी कर्ज वाटपासह संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली. संचालक रामदास वरखडे, शांताराम कळसकर, ॲड. सुनील मेसे, दामू लंके, भिवाजी रसाळ, लताबाई कवाद आदींनी सभेपुढील विषयांचे वाचन केले. संस्थेचे नामकरण बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्था करण्याचा ठराव बाळासाहेब लामखडे यांनी मांडला. त्यास सर्वानुमते संमती देऊन लवकरात लवकर नामकरण करण्याची सभासदांनी इच्छा व्यक्त केली.

यावेळी रामदास कवाद, बहिरू कळसकर, खंडू लामखडे, निवृत्ती तनपुरे, बबन तनपुरे, खंडू इधाटे, संदीप रसाळ आदींनी सहभाग घेतला.

---

विनातारण कर्ज मिळाल्याने आधार..

कोरोनाच्या काळात अडचणीच्या वेळी ३०० व्यावसायिकांना विनातारण १ लाख रुपये कर्ज वाटप केल्यामुळे आधार मिळाला, अशी भावना व्यावसायिकांनी बोलून दाखविली.

--

२७ वसंतराव कवाद

Web Title: 155 crore from the trust of the members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.