खर्डा येथे १६ व्यावसायिक काेरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:21 AM2021-04-10T04:21:31+5:302021-04-10T04:21:31+5:30
खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथे बसस्थानक परिसरात रॅपिड अँटिजन किटद्वारे कोरोना तपासणी करण्यात आली. शहरातील जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांच्या ...
खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथे बसस्थानक परिसरात रॅपिड अँटिजन किटद्वारे कोरोना तपासणी करण्यात आली. शहरातील जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांच्या तपासणीमध्ये १६ व्यावसायिक कोरोनाबाधित आढळून आले.
येथे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी आढावा बैठक घेतली. या वेळी सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य वैभव जामकावळे, महालिंग कोरे, ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते आदी प्रमुख उपस्थित होते. येथील जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांची सर्वांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय झाला. प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बिरंगळ, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अमोल मुसळे, आरोग्य सेवक नीलेश खाडे यांनी खर्डा बसस्थानक परिसरात शहरातील व्यापाऱ्यांची रॅपिड अँटिजन चाचणी केली. त्यात १६ जण कोरोनाबाधित आढळून आले.