गोदावरी नदीत १६ हजार २४६ क्युसेक पाणी सोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 10:32 AM2020-06-04T10:32:34+5:302020-06-04T11:18:24+5:30

गुरुवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास नांदूर मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रात १६ हजार २४६ इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

16 thousand 246 cusecs of water was released in Godavari river | गोदावरी नदीत १६ हजार २४६ क्युसेक पाणी सोडले

गोदावरी नदीत १६ हजार २४६ क्युसेक पाणी सोडले

कोपरगाव : बुधवारी निसर्ग चक्रीवादळाने नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने तेथील सर्वच धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन पाण्याची आवक झाली. त्यामुळे गुरुवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास नांदूर मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रात १६ हजार २४६ इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे,अशी माहिती पाठबंधारे विभागाने दिली आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच गोदावरीला पाणी येत असल्याने नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
निसर्ग चक्रीवादळाने नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली. त्यामुळे नांदुर मधमेश्वर धरणातील पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

---

गोदावरीत पाणी सोडण्याचे संग्रहित छायाचित्र

Web Title: 16 thousand 246 cusecs of water was released in Godavari river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.