संगमनेर-लोणी रस्त्यावर १७२ किलो गांजा पकडला, कारमधून वाहतूक ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By शेखर पानसरे | Published: November 6, 2022 03:30 PM2022-11-06T15:30:38+5:302022-11-06T15:30:48+5:30

कारमधून गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी संगमनेर-लोणी रस्त्यावर संगमनेर तालुक्यातील समनापूर शिवारात सापळा रचून पकडले. १७२ किलो गांजासह कार, दोन मोबाइल असा एकुण २३ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

172 kg ganja seized on Sangamner-Loni road, | संगमनेर-लोणी रस्त्यावर १७२ किलो गांजा पकडला, कारमधून वाहतूक ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर-लोणी रस्त्यावर १७२ किलो गांजा पकडला, कारमधून वाहतूक ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर : कारमधून गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी संगमनेर-लोणी रस्त्यावर संगमनेर तालुक्यातील समनापूर शिवारात सापळा रचून पकडले. १७२ किलो गांजासह कार, दोन मोबाइल असा एकुण २३ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सदर कारवाई संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पोलीस पथकाने केली.

कारमधून मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मदने यांना मिळाली. त्यांनी विशेष पोलीस पथकाला कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यांनतर शनिवारी (दि.५) रात्री सव्वा आठच्या सुमारास पोलीस कर्मचारी कारवाईसाठी कोल्हार-घोटी राज्यमहामार्गावर थांबले. रात्री ११. ५० च्या सुमारास लोणीहून संगमनेरच्या दिशेने येत असलेल्या कारच्या (एम. एच. ५०, एल. ९९७०) चालकाला थांबविण्याचा इशारा केल्यानंतर त्याने कार थांबविली. चालक व त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला पोलिसांनी नाव, पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे संदिप लक्ष्मण भोसले (वय ३५, रा. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा), बाळासाहेब भाऊसाहेब शिंदे (वय ३०, रा. वडगाव सावताळ, ता. पारनेर, जि. अहमदनगर) अशी सांगितली. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता त्यात १७ पाकिटे आढळून आली, ती सर्व पाकिटे उघडून पाहिली असता त्यात गांजा आढळून आला. भोसले आणि शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील कार पोलीस ठाण्यात आणण्यात आली.

 या प्रकरणी पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव अधिक तपास करीत आहेत. सदर कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दातीर, पोलीस कॉस्टेबल अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, पोलीस नाईक अनिल कडलग, श्याम हासे, बापूसाहेब हांडे, सायबर सेलचे फुरकान शेख, प्रमोद जाधव, बाबासाहेब खेडकर, पोलीस कॉस्टेबल अनिल उगले, पोलीस हेड कॉस्टेबल मनोज पाटील, अमित महाजन, पोलीस नाईक विजय पवार, कानिफनाथ जाधव, साईनाथ पवार आदींनी केली.

Web Title: 172 kg ganja seized on Sangamner-Loni road,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस