‘वॉटर कप’साठी अहमदनगर जिल्ह्यातील १७५ गावे सरसावली

By चंद्रकांत शेळके | Published: April 15, 2018 06:28 PM2018-04-15T18:28:12+5:302018-04-16T08:16:00+5:30

महाराष्ट्रातील दुष्काळ हटवण्याचा विडा उचललेल्या अभिनेते अमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या तिस-या वॉटर कप स्पर्धेत नगर जिल्ह्यातून पहिल्यांदाच १७५ गावांनी सहभाग नोंदवला असून, या गावांत युद्धपातळीवर जलसंधारण, पाणलोटाच्या कामास प्रारंभ झाला आहे.

175 villages of Sarasavali in Ahmednagar district for 'Water Cup' | ‘वॉटर कप’साठी अहमदनगर जिल्ह्यातील १७५ गावे सरसावली

‘वॉटर कप’साठी अहमदनगर जिल्ह्यातील १७५ गावे सरसावली

ठळक मुद्दे पाणी फाऊंडेशनजिल्ह्याचा पहिल्यांदाच समावेश४५ दिवसांत जलयुक्त शिवार

चंद्रकांत शेळके
अहमदनगर : महाराष्ट्रातील दुष्काळ हटवण्याचा विडा उचललेल्या अभिनेते अमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या तिस-या वॉटर कप स्पर्धेत नगर जिल्ह्यातून पहिल्यांदाच १७५ गावांनी सहभाग नोंदवला असून, या गावांत युद्धपातळीवर जलसंधारण, पाणलोटाच्या कामास प्रारंभ झाला आहे.
वॉटरकप स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून राज्यातील २४ जिल्ह्यांतून ७५ तालुक्यांतील ४ हजार ३० गावे यंदा स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे २०१८ असा आहे. विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख, ५० लाख आणि ४० लाख रुपये रोख पारितोषिक दिले जाईल. याशिवाय प्रत्येक तालुक्यातील आघाडीवर असलेल्या गावालाही प्रत्येकी दहा लाख रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे. स्पर्धा तीन वर्षांपासून सुरू झालेली असली तरी अहमदनगर जिल्ह्याने यंदा पहिल्यांदाच सहभाग नोंदवला आहे. त्यात कर्जत (४१ गावे), नगर (२५), जामखेड ( २८), पाथर्डी (४२) व पारनेर (३९) या पाच तालुक्यांचा समावेश आहे. स्पर्धेत भाग घेणा-या प्रत्येक गावातील पाच प्रशिक्षणार्थींना पाणी फाऊंडेशननेपाणलोट विकासाच्या विज्ञानाचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेतील ४५ दिवसांत गावात श्रमदानाने तसेच मशीनच्या सहाय्याने जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण रचना उभारुन पाणी साठवण क्षमता निर्माण करायची आहे. विविध सामाजिक संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, प्रशासन तसेच सर्वच विभागाच्या शासकीय अधिका-यांसह सर्वांनी कामात झोकून देत कामास सुरूवात केली आहे.
स्पर्धेत करायची कामे
घरातून वाया जाणाºया पाण्यासाठी शोषखड्डे, पर्यावरण समतोल राखण्यासाठी गावाने रोपवाटिका तयार करुन लोकसंख्येच्या दुप्पट वृक्षारोपण, जलसंधारणाच्या विविध कामासाठी श्रमदान व लोकसहभागातून यंत्राने विविध कामे, गावाचे माती परीक्षण, काडीपेटी मुक्त शिवार, गावाच्या पाण्याचे बजेट, नापेड प्रकल्प, माथा ते पायथा या तंत्राने जलसंधारणाची विविध कामे गावाने करायची आहेत. या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर एक, तसेच तालुकानिहाय एक प्रतिनिधी नेमण्यात आला आहे. तसेच पाणी फाऊंडेशनची समिती गावनिहाय भेटी देऊन कामांची तपासणी करत गुणदान करणार आहे. त्यातून यशस्वी गावे निवडली जातील.

वॉटर कप स्पर्धेत सहभागी तालुकानिहाय गावे
कर्जत :
दुरगाव, चापङगाव, निबे, टाकळी खाडेश्वरी, भोसे, चखालेवाडी, बेलगाव, तिखी, ङिकसळ, रेहकुरी, आखोनी, खाङवी, खुरगेवाडी, नागलवडी, डोबाळवाडी, बाभुळगाव खालसा, बजरगवाडी, खंडाळा, गोयकरवाडी, आबीजळगाव, बारङगाव सुद्रिक, जळगाव, कोकणगाव, कापरेवाडी, करमनवाडी, कानगुडवाडी, राक्षसवाडी बुद्रूक, निमगाव डाकू, तळवडी, मिरजगाव, गोदडी, घुमरी, नागमठाण, मुळेवाडी, कौडाणे, मांदळी, कुंभेफळ, आळसुदे, परिटवाडी, पाटेगाव,
नगर :
मांजरसुंभा, देहरे, जेऊर, नांदगाव, डोंगरगण, आठवड, चिचोंडी पाटील, गुंडेगाव, शेंडी, पिंपळगाव उज्जैणी, ससेवाडी, पिंपळगाव वाघा, हिवरेझरे, अकोळनेर, कौडगाव, मजले चिंचोली, खांडके, दशमीगव्हाण, अरणगाव, खडकी, खारेकर्जुने, धनगरवाडी, निमगाव घाणा, नारायणडोह, सारोळा कासार.
जामखेड :
मोहा, झिक्री, जायभाय वाडी, तेलंगशी, मोहरी, बाळगव्हाण, बांधखडक, आघी, घोडेगाव, नान्नज, आनंदवाडी, नायगाव, फाक्राबाद, शिऊर, साकत, अरणगाव, पारेवाडी, हसनाबाद, मतेवाडी, हळगाव, जवळा, वाघा, डोळेवाडी, मुंजेवाडी, सावरगाव, राजुरी, जवळके, पोतेवाडी.
पाथर्डी :
मोहोज खुर्द, खेर्डे , डमाळवाडी, कोल्हार, मुंगसवाडे, करंजी, देवराई, पिंपळगाव टपा, अकोला, जोगेवाडी, आगसखांड, मालेवाडी, कोळसांगवी, शिराळ, वसु, राघो हिवरे, माळेगाव, भिलवडे, पालवेवाडी, हाकेवाडी, मोहरी, बडेवाडी, करोडी, ) चिचोंडी, निवडुंगे, जोहारवाडी, शेकटे, तोंडोळी, खरवंडी कासार, एकनाथवाडी, भालगाव, टाकळी मानूर, पारेवाडी, घाटशिरस, कामतशिंगवे, मिरी, माणिकदौडी, पागोरी, पिंपळगाव, प्रभू पिंपरी, रेणुकाई वाडी, शिरसाठवाडी, पिरेवाडी, डमाळवाडी ( माणिकदौंडी),
पारनेर :
माळकूप, वडणेर बुद्रुक, तिखोल, वाडेगव्हाण, पिंप्री गवळी, रुईछत्रपती, नांदूर पठार, सुलतानपूर, कडूस, लोणी हवेली, पाणोली, पुणेवाडी, दैठणे गुंजाळ, कोहकडी, पिंपळगाव रोठा, बाभूळवाडे, हिवरे कोर्डा, भाळवणी, जाधववाडी, गोरेगाव, पिंपळगाव तुर्क, हंगा, जामगाव, बहिरोबावाडी, अक्कलवाडी, भांडगाव, गटेवाडी, कळमकरवाडी, वेसदरे, गारगुंडी, म्हसणे, जातेगाव, काळकूप, भनगडेवाडी, पाडळीतर्फे कान्हूर, बाबुर्डी, कासारे, किन्ही, वासुंदे.

 

Web Title: 175 villages of Sarasavali in Ahmednagar district for 'Water Cup'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.