राज्यातील १७७ तहसीलदार होणार उपजिल्हाधिकारी

By चंद्रकांत शेळके | Published: June 28, 2019 03:49 PM2019-06-28T15:49:45+5:302019-06-28T15:51:31+5:30

तहसीलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती देण्याच्या अनुषंगाने शासनाने सर्व विभागीय आयुक्तांकडून माहिती मागवली आहे.

 177 tehsildars in the state will be deputy collector | राज्यातील १७७ तहसीलदार होणार उपजिल्हाधिकारी

राज्यातील १७७ तहसीलदार होणार उपजिल्हाधिकारी

चंद्रकांत शेळके
अहमदनगर : तहसीलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती देण्याच्या अनुषंगाने शासनाने सर्व विभागीय आयुक्तांकडून माहिती मागवली आहे. यात राज्यातील १७७ तहसीलदारांची नावे असून नाशिक विभागातील ३५ जणांचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात हे तहसीलदार उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर विराजमान होणार आहेत.
अनेक वर्षांपासून तालुकास्तरावर, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांत तहसीलदार कार्यरत आहेत. त्यांचा कामाचा अनुभव, तसेच रिक्त असणारी उपजिल्हाधिकाऱ्यांची पदे या दोन्ही बाबी विचारात घेऊन शासनाने तहसीलदारांना पदोन्नती देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी महसूल मंत्रालयाने सर्व विभागीय आयुक्तांकडून तहसीलदारांची खातेनिहाय माहिती मागवली आहे.
तहसीलदारांचे मागील दहा वर्षांतील सर्व मूळ गोपनीय अहवाल, ज्या कालावधीचे गोपनीय अहवाल नसतील,त्या कालावधीची प्रमाणपत्रे , गोपनीय अहवालात प्रतिकूल शेरे नोंदविले असल्यास त्याबाबत अधिकाºयावर केलेली कार्यवाही, तहसीलदारांनी ज्या पदांवर काम केले, तेथील सेवातपशील, तसेच तहसीलदारांविरूद्धची विभागीय चौकशी, फौजदारी कारवाई, शिक्षा झाली असल्यास असा तपशील, या अधिकाºयांनी २०१९अखेर मत्ता व दायित्व प्रमाणपत्र सादर केल्याचा तपशील, जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची स्थिती, सेवापुस्तिकेच्या प्रती अशी एकत्रित माहिती ५ जुलैपर्यंत शासनाने मागवली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील उपजिल्हाधिकाºयांच्या पदोन्नत्या रखडल्या आहेत. या पदोन्नत्या झाल्यास अनेक उपजिल्हाधिकाºयांची पदे रिक्त होणार आहेत. त्यामुळे ही पदे भरण्यासाठी शासनाने राज्यातील ज्या १७७ तहसीलदारांचा विचार केला आहे, त्यात नाशिक जिल्ह्यातील ३५ जणांचा समावेश आहे.

पदोन्नतीसाठी यांची मागितली माहिती
नाशिक विभागातून गणेश मरकड, आर. बी. थोटे, भारती सागरे, सुनील सैंदाणे, हेमा बडे, सदाशिव शेलार, अप्पासाहेब शिंदे, माणिक आहेर, अनिल दौंडे, अर्चना खेतमाळीस, बबन काकडे, चंद्रशेखर देशमुख, के. टी. कडलग, दादासाहेब गिते, वंदना खरमाळे, महेश शेलार, शर्मिला भोसले, मनोजकुमार खैरनार, सुदाम महाजन, महेंद्र पवार, कैलास देवरे, गणेश राठोड, सुचिता भामरे, सुरेश कोळी, एस. एम. आवळकंठे, सुभाष दळवी, विजयकुमार ढगे, एम. एस. देशमुख, बाबासाहेब गाढवे, नितीन पाटील, शरद मंडलिक, हरिष सोनार, नितीन गवळी, रचना इंदूरकर, प्रमोद हिले, दीपक पाटील, मनीषा राशीनकर (नागपूर) यांची माहिती शासनाने मागितली आहे. यात नगर जिल्ह्यात कार्यरत असलेले व नगरमधून अन्यत्र बदली झालेल्या आठ ते दहा तहसीलदारांचा समावेश आहे.

Web Title:  177 tehsildars in the state will be deputy collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.