३६७ केंद्रांवर राहणार २ हजार पोलीस तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 05:29 PM2018-12-08T17:29:18+5:302018-12-08T17:29:34+5:30

महापालिका निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, रविवारी (दि़९) मतदानाच्या दिवशी शहरातील ३६७ केंद्रांवर दोन हजार पोलीस बळ तैनात राहणार आहे़

2 thousand police personnel will be deployed at 367 centers | ३६७ केंद्रांवर राहणार २ हजार पोलीस तैनात

३६७ केंद्रांवर राहणार २ हजार पोलीस तैनात

अहमदनगर : महापालिका निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, रविवारी (दि़९) मतदानाच्या दिवशी शहरातील ३६७ केंद्रांवर दोन हजार पोलीस बळ तैनात राहणार आहे़ भरारी पथकही प्रत्येक केेंद्रावर भेटी देऊन नजर ठेवणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले़
महापालिकेसाठी रविवारी मतदान होत असून, मतदानासाठी शहरातील ७३ इमारतीत ३६७ मतदान केंद्र राहणार आहेत़ यातील केडगाव, सारसनगर व मुकुंदनगर येथील ११ इमारतीतील ४१ केंद्र हे अतिसंवेदनशील आहेत तर १३७ संवेदनशील केंद्र आहेत़ अतिसंवेदनशील केंद्रावर १ पोलीस अधिकारी, १० पोलीस कर्मचारी व ५ होमगार्ड तर संवेदनशील केंद्रांवर १ पोलीस अधिकारी ५ पोलीस कर्मचारी व दोन होमगार्ड असा बंदोबस्त तैनात राहणार आहे़
मतदानाच्या दिवशी एक भरारी पथक कार्यरत राहणार आहे़ यामध्ये १ अधिकारी, १७ कर्मचारी व एसआरपीएफची एक प्लाटून राहणार आहे़ हे पथक प्रत्येक केंद्रावर भेट देऊन पाहणी करणार आहे़

Web Title: 2 thousand police personnel will be deployed at 367 centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.