ग्रामपंचायत बिनविरोध केल्यास २० लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:17 AM2020-12-26T04:17:22+5:302020-12-26T04:17:22+5:30
येळपणे गटातील येळपणे, म्हसे, पिंप्री कोलंदर, उक्कडगाव, ढवळगाव, राजापूर, रायगव्हाण या सात गावात, तर देवदैठण गणातील हिंगणी दुमाला, गव्हाणेवाडी, ...
येळपणे गटातील येळपणे, म्हसे, पिंप्री कोलंदर, उक्कडगाव, ढवळगाव, राजापूर, रायगव्हाण या सात गावात, तर देवदैठण गणातील हिंगणी दुमाला, गव्हाणेवाडी, येवती, अरणगाव, कोंडेगव्हाण, निंबवी, कोरेगव्हाण, सारोळा सोमवंशी, चांभुर्डी, एरंडोली या दहा गावांत निवडणूक होत आहे. त्यामुळे येळपणे गटात गट-तट व भावकी-गावकीने राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, याचे रूपांतर भांडणात होऊन गावे दुभंगू नयेत व गावांच्या सर्वांगीण विकासासाठी या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करत माजी आ. राहुल जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घन:शाम शेलार यांच्या प्रयत्नातून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या ग्रामविकास विभागांतर्गत १५ लाख रुपये व क्रीडामंत्री अदिती तटकरे यांच्या क्रीडा विभागांतर्गत ५ लाख रुपये विकास निधी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावाला देणार आहे, असे लोखंडे म्हणाल्या.
-------------
सध्या कोरोनामुळे सर्वांनाच आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. वाद-विवाद टाळून गाव तंटामुक्त करण्यासाठी, गावाच्या विकासासाठी व आर्थिक संकटात शासनाचे पैसे वाचविण्यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी त्यासाठी २० लाखांचा निधी उपलब्ध करून देणार आहे.
- कल्याणी लोखंडे, पंचायत समिती सदस्या