२० हजार जनावरे घरच्या दावणीला

By Admin | Published: June 29, 2016 12:46 AM2016-06-29T00:46:17+5:302016-06-29T00:53:13+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे छावण्यांच्या संख्येत निम्म्याने घट झाली असून, छावण्यांतील २० हजार जनवारे घरी परतली आहेत़

20 thousand animals in house cremation | २० हजार जनावरे घरच्या दावणीला

२० हजार जनावरे घरच्या दावणीला


अहमदनगर : जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे छावण्यांच्या संख्येत निम्म्याने घट झाली असून, छावण्यांतील २० हजार जनवारे घरी परतली आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़
जिल्ह्यात पिण्याचे पाणी व चाऱ्याची टंचाई तीव्र टंचाई निर्माण झाली होती़ त्यामुळे जिल्ह्यात गेल्या एप्रिलपासून छावण्यात सुरू होत्या़ चारा नसल्याने शेतकऱ्यांनी आपली जनावरे छावणीत नेऊन बांधली़ गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील ४८ हजार ३९३ जनावरांचा छावण्यांत मुक्काम होता़ मात्र मान्सूनच्या आगमनाने जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस पडला़ विशेषकरून दक्षिण नगर जिल्ह्यात सामधानकारक पाऊस पडल्याने गेल्या आठ दिवसांत १९ छावण्या बंद करण्यात आल्या आहेत़ या छावण्यांत २० हजार ४०३ जनावरे होती़ ही जनावरे शेतकरी घरी घेवून गेले़ पाऊस पडल्याने मशागतीलाही चांगला वेग आला आहे़ जिल्ह्यात ४७ छावण्यांना मंजुरी देण्यात आली होती़ त्यापैकी ३९ छावण्या सुरू होत्या़ पाथर्डी, नेवासा, जामखेड, नगर, शेवगाव तालुक्यातील १९ छावण्या बंद झाल्या असून, उर्वरित २० छावण्यात सुरूच आहेत़ जामखेड, कर्जत, नेवासा, नगर, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, संगमनेर आणि राहुरी तालुक्यांतील २८ हजार ९९३ जनावरांचा मुक्काम अद्याप छावण्यांतच आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: 20 thousand animals in house cremation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.