२०० कोटींचा चारा घोटाळा, न्यायालयात याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 04:49 AM2018-02-08T04:49:04+5:302018-02-08T04:49:12+5:30
दुष्काळी परिस्थितीत २०१२-१३ व २०१३-१४ मध्ये सुरू केलेल्या गुरांच्या चारा छावण्यांमध्ये २०० कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा तक्रारदाराने केला असून ४२६ संस्थांवरील कारवाईची प्रक्रिया होऊन बुधवारी १३६ संस्थांविरोधात गुन्हे दाखल झाले.
अहमदनगर : दुष्काळी परिस्थितीत २०१२-१३ व २०१३-१४ मध्ये सुरू केलेल्या गुरांच्या चारा छावण्यांमध्ये २०० कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा तक्रारदाराने केला असून ४२६ संस्थांवरील कारवाईची प्रक्रिया होऊन बुधवारी १३६ संस्थांविरोधात गुन्हे दाखल झाले.
गुन्हा दाखल झालेल्या संस्था जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांशी संबंधित असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे़ चारा घोटाळ्यांप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या संस्थांमध्ये नेवासा, पाथर्डी आणि श्रीगोंदा, जामखेड तालुक्यातील छावणी चालक संस्थांचा समावेश आहे़ जिल्ह्यातील एकूण ११ तालुक्यांतील छावण्यांमध्ये अनियमितता आढळून आलेली आहे़
एकूण पशुधनाच्या तिप्पट जास्त जनावरे दाखविण्यात येऊन त्यात संस्था चालकांसह अधिकाºयांचेही हात गुंतलेले आहेत़ सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब गायके यांनी जिल्ह्यातील दुष्काळी छावण्या व चारा डेपोबाबत माहिती अधिकारात माहिती मागविली होती़ चारा छावण्यांत कागदोपत्री दाखविलेली जनावरे व प्रत्यक्षातील पशूधन, यांत मोठी तफावत असल्याचे गायके यांच्या निदर्शनास आले़
गायके यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली़ न्यायालयाने कागदपत्रांची पडताळणी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश शासनास दिला़ कारवाईचा अहवाल शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केला जाईल.
शेवगाव तालुक्यात ४० तर पाथर्डी तालुक्यात ७४ लाख जनावरे दाखविण्यात आल्याची गायके यांची तक्रार आहे़