नगर जिल्ह्यात आज २०७ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले; सातशे जणांना घरी सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 01:11 PM2020-08-31T13:11:51+5:302020-08-31T13:12:39+5:30
अहमदनगर जिल्ह्यात सोमवारी (३१ आॅगस्ट) तब्बल ७०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजल्यापासून सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २०७ ने वाढ झाली.
अहमदनगर : जिल्ह्यात सोमवारी (३१ आॅगस्ट) तब्बल ७०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजल्यापासून सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २०७ ने वाढ झाली.
आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ हजार ८७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, यामुळे उपचार सुरू असणा-या रुग्णांची संख्या आता ३ हजार ९१ इतकी झाली आहे.
बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११२, संगमनेर ४, राहाता २, पाथर्डी १८, नगर ग्रामीण ११, श्रीरामपूर १, नेवासा १, पारनेर १, अकोले २१, राहुरी १७, कोपरगाव ३, जामखेड १२, कर्जत ३ आणि मिलिटरी हॉस्पिटल १ अशा रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत नगर जिल्ह्यात २९० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या २१ हजार २५७ झाली आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ.बापूसाहेब गाढे यांनी दिली.