मठ्ठपिंप्रीत तपासणी मोहिमेत सापडले २२ काेरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:21 AM2021-04-10T04:21:02+5:302021-04-10T04:21:02+5:30

केडगाव : नगर तालुक्यातील मठ्ठपिंप्री येथे कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला असून, शुक्रवारी झालेल्या रॅपिड ॲंटिजेन टेस्टमध्ये २२ जण बाधित ...

22 Carona patients found in Mathapimpri investigation | मठ्ठपिंप्रीत तपासणी मोहिमेत सापडले २२ काेरोना रुग्ण

मठ्ठपिंप्रीत तपासणी मोहिमेत सापडले २२ काेरोना रुग्ण

केडगाव : नगर तालुक्यातील मठ्ठपिंप्री येथे कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला असून, शुक्रवारी झालेल्या रॅपिड ॲंटिजेन टेस्टमध्ये २२ जण बाधित आढळून आले.

यावेळी ९८ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये रुईछत्तीसी २, हातवळण १, सांगवी ४, वाटेफळ १, लोणी सय्यदमीर २ असे मिळून एकूण २२ जण बाधित रुग्ण आढळले. या अगोदर साकत या ठिकाणी १३ रुग्ण बाधित आढळले. दोन दिवसानंतर दहिगाव या ठिकाणी ३७ बाधित रुग्ण आढळून आले होते. या आधीचे रुई, साकत, दहीगाव खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. कुटुंबातील अनेक सदस्य मित्र यांना यांचा प्रसाद मिळाल्याने बाधित रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढतच चालली आहे. यातील काही बाधित रुग्णांना त्रास जाणवत नसल्याचे रुग्ण स्पष्ट सांगत आहेत.

रॅपिड अँटिजेन शिबिर यशस्वीतेसाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र भापकर, तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे, वैद्यकीय अधिकारी एस.ए. ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. हिवाळे, संदीप भालसिंग, आशा सुपरवायझर विजया लंके, रुई उपकेंद्राच्या आरोग्य अधिकारी सविता ससाणे, परिचारिका आरती कसबे, अंगणवाडीसेविका शोभा सांगळे, आशासेविका अंजना नवसुपे, ग्रामसेवक यवले, सरपंच हाैसराव नवसुपे, उपसरपंच सरस्वती उकाडे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: 22 Carona patients found in Mathapimpri investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.