‘संजीवनी’च्या २२ विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:20 AM2021-01-20T04:20:53+5:302021-01-20T04:20:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : ‘संजीवनी’ने एसएपी या प्रशिक्षण देणाऱ्या जागतिक पातळीवरील कंपनीशी सामंजस्य करार केला केला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : ‘संजीवनी’ने एसएपी या प्रशिक्षण देणाऱ्या जागतिक पातळीवरील कंपनीशी सामंजस्य करार केला केला आहे. या कंपनीचे एक केंद्र संजीवनीमध्ये असून, या केंद्राद्वारे विद्यार्थांना प्रशिक्षण देऊन सक्षम केले जाते. अलिकडेच या केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या संजीवनीच्या २२ विद्यार्थांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. त्यातील ७ विद्यार्थांना कंपनीने सुरुवातीस वार्षिक पॅकेज ४ लाख देऊ केले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
काॅग्निझंट या अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनीने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अनिकेत कोते, अनुजा निचित, पोथिवाल सुरजीत सिंग, क्षितिजा गवारे, रिया शेळके, स्नेहल पिंपळे, तर उटोपिया या बहुराष्ट्रीय कंपनीने सचिन जगताप यांची निवड करून या सर्वांना कंपन्यांनी सुरुवातीस ४ लाखांचे वार्षिक पॅकेज दिले आहे. इन्वेनियो या कंपनीने प्रतिभा संवत्सरकर, राहुल रहाणे व निकिता सालके यांचीही ४ लाख वार्षिक पॅकेजवर निवड केली आहे. एनटीटी डेटा या कंपनीने विक्रम अलगट याची ३.७५ लाख वार्षिक पॅकेजवर निवड केली आहे. ऋषिकेश रोडे याची क्रिप्ट टेक्नालाॅजीज या कंपनीने ३.५ लाख वार्षिक पॅकेजवर निवड केली आहे. कॅप्जेमिनी कंपनीने सोमेश राजेंद्र सोनवणे याची ३ लाख वार्षिक पॅकेजवर निवड केली आहे. डेवुज टेक्नाॅलाॅजी या कंपनीने प्रवीण आवारे, विप्रो कंपनीने परमेश्वर अंकुश इंगळे याची, तर क्नुविक टेक्नाॅलाॅजी या कंपनीने विशाल खातने व धीरज खेडकर यांची निवड केली आहे. टेक महिंद्रा या कंपनीने प्रतिभा संवत्सरकर, श्रुती फळे, ऋतुजा आरोटे, आरूंधती देशमुख व तुषार टोके यांची निवड केली, असेही कोल्हे यांनी सांगितले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी निवड झालेले सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे कौतुक केले. या सर्व विद्यार्थांना प्राचार्य डाॅ. ए. जी. ठाकूर, डाॅ. ए. बी. पवार यांचे मार्गदर्शन लाभले. (वा.प्र.)
.........
फोटो-१९अमित कोल्हे