नगर जिल्ह्यात आज २२९ नवे कोरोनाबाधित; ४८४ जणांंना डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 01:28 PM2020-08-26T13:28:01+5:302020-08-26T13:28:26+5:30
मंगळवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून बुधवारी (२६ आॅगस्ट) दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २२९ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाºया रुग्णांची संख्या आता २९७३ इतकी झाली आहे.
अहमदनगर : मंगळवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून बुधवारी (२६ आॅगस्ट) दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २२९ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाºया रुग्णांची संख्या आता २९७३ इतकी झाली आहे.
नगर जिल्ह्यात आज ४८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १५ हजार १५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८२.२८ टक्के इतके झाले आहे.
बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४१, संगमनेर १९, राहाता १, पाथर्डी ४, नगर ग्रामीण ३१, कँटोन्मेंट ५, नेवासा ३, पारनेर १२, अकोले ३, राहुरी ११, कोपरगाव ३, जामखेड २ आणि इतर जिल्हा ४ अशा रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत १५ हजार १५ कोरोनातून रुग्ण बरे झाले आहेत.
२ हजार ९७३ रुग्ण कोरोनाचा उपचार घेत आहेत. एकूण रुग्ण संख्या १८ हजार २४८ झाली आहे. आतापर्यंत नगर जिल्ह्यात २६० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्ळ रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.