ग्रामपंचायतीसाठी २३ हजार अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:14 AM2021-01-01T04:14:47+5:302021-01-01T04:14:47+5:30

अहमदनगर : जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतीच्या ७ हजार १३४ जागांसाठी तब्बल २३ हजार ८१८ अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक ...

23,000 applications filed for Gram Panchayat | ग्रामपंचायतीसाठी २३ हजार अर्ज दाखल

ग्रामपंचायतीसाठी २३ हजार अर्ज दाखल

अहमदनगर : जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतीच्या ७ हजार १३४ जागांसाठी तब्बल २३ हजार ८१८ अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार ६७८ अर्ज संगमनेर तालुक्यात दाखल झाले आहेत. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत अर्जांची छाननी सुरू होती. शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतल्यानंतर सोमवारी (दि. ४) ग्रामपंचायतीमधील लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे.

जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतीसाठी ७ हजार १३४ जागांसाठी जिल्ह्यात तब्बल २३ हजार ८१८ इतके अर्ज दाखव झाले. शेवटच्या दिवशी बुधवारी (दि. ३०) सर्वाधिक १५ हजार ५५२ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज स्वीकारण्यासाठी ऑफलाईनची सवलत देण्यात आली होती. तसेच जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्यासाठीही ऑफलाईन सवलत देण्यात आली होती. एकूण सदस्यसंख्येच्या तिप्पटीपेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत. बहुतांश ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढतीची शक्यता आहे. अर्ज माघारी घेतल्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

-----------

तालुका ग्रा. पं. सदस्य संख्या एकूण अर्ज

अकोले ५२ ४६६ ११५३

संगमनेर ९४ ८६७ २६७८

कोपरगाव २९ २७९ ९९६

श्रीरामपूर २७ ३०१ ११०९

राहाता २५ ४१८ १२०८

राहुरी ४४ ५१९ १४०७

नेवासा ५९ ५८३ २०७२

नगर ५९ ७७६ १९२९

पारनेर ८८ ६८० २३८९

पाथर्डी ७८ ४०८ १३३२

शेवगाव ४८ ५०४ १७५२

कर्जत ५६ ५०४ १७६२

जामखेड ४९ ४१७ १३०२

श्रीगोंदा ५९ ५६५ २१६३

एकूण ७६७ ७१३४ २३८१८

-----

अशी आहे निवडणूक

एकूण ग्रामपंचायती- ७६७

एकूण सदस्य संख्या- ७ हजार १३४

एकूण प्रभाग संख्या -२ हजार ६२९

मतदान केंद्र संख्या -२ हजार ८५९

एकूण मतदार- १५ लाख ५० हजार ४९१

पुरुष मतदार- ८ लाख १३ हजार ३१

महिला मतदार- ७ लाख ३७ हजार ४५१

Web Title: 23,000 applications filed for Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.