जिल्ह्यात एकाच दिवसात २४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले; नगर शहरातील १८ रुग्णांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 02:59 PM2020-06-24T14:59:24+5:302020-06-24T15:00:11+5:30
अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी (२४ जून) दुपारी दीड वाजेपर्यंत २४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात नगर शहराच्या विविध भागातील १८ जणांचा समावेश आहे. तर ७० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी (२४ जून) दुपारी दीड वाजेपर्यंत २४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात नगर शहराच्या विविध भागातील १८ जणांचा समावेश आहे. तर ७० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
संगमनेर ४, जामखेड व श्रीरामपूर येथे प्रत्येकी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६२ झाली आहे एकूण रुग्ण संख्या ३२८ इतकी झाली आहे? तर २५४ जण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहरातील तोफखाना भागातील ८, दिल्लीगेट भागातील २, रासनेनगर भागात २, लेंडकर मळ्यात १, बालिकाश्रम रोड १, सिध्दार्थनगर ४,
दरम्यान, संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड येथील ४० वर्षीय पुरुष आणि नवघरे गल्ली येथील २६ वर्षीय युवकाचा समावेश आहे. याशिवाय, श्रीरामपूर येथील ३८ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळला आहे. तर जामखेड तालुक्यातही एक युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.