कुकाणा तलाठी कार्यालयात २४ तास विजेचा लखलखाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 04:55 PM2020-06-27T16:55:44+5:302020-06-27T17:13:35+5:30
कुकाणा कामगार तलाठी कार्यालयात दिवस रात्र विजेचा अपव्यय होत आहे. विजेच्या बचतीचा मंत्र देणा-या सरकारला यानिमित्ताने घरचा आहेर मिळत आहे. नागरिकांमधून त्याविरोधात संताप व्यक्त होत आहे.
कुकाणा : कामगार तलाठी कार्यालयात दिवस रात्र विजेचा अपव्यय होत आहे. विजेच्या बचतीचा मंत्र देणा-या सरकारला यानिमित्ताने घरचा आहेर मिळत आहे. नागरिकांमधून त्याविरोधात संताप व्यक्त होत आहे.
कुकाणा कार्यालयात शुक्रवार ते रविवार हे तीन दिवस सर्रासपणे विजेचा अपव्यय सुरू आहे. शुकवारी सकाळी ११ वाजेपासून रविवारपर्यंत कार्यालयातील प्रत्येक कक्षाचे विजेचे दिवे चालूच राहतात. अधिकारी व कर्मचाºयांच्या गैरहजेरीत खुर्च्यांना पंख्याची हवा खायला मिळते. रात्रभर कार्यालयात विजेचा लखलखाट पाहून नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.
विजेचे भरमसाठ बिल आल्यानंतर ते जनतेच्याच पैैशातून भरले जाते. त्यामुळे तातडीने प्रशासनाने कामगार तलाठ्यांना आदेश देऊन म्हणणे मागवावे, अशी मागणी होत आहे.