कोरोनाबाधितांच्या अंत्यविधीसाठी २४ तास यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:19 AM2021-04-06T04:19:14+5:302021-04-06T04:19:14+5:30
अहमदनगर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत मृतांची संख्या वाढली होती. त्यामुळे अंत्यविधीसाठी अमरधाममध्ये रांगा लागत होत्या. महापालिकेने तातडीने दुसरी विद्युत ...
अहमदनगर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत मृतांची संख्या वाढली होती. त्यामुळे अंत्यविधीसाठी अमरधाममध्ये रांगा लागत होत्या. महापालिकेने तातडीने दुसरी विद्युत दाहिनी बसवल्याने अंत्यविधी करणे सुलभ झाले आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी आता प्रतीक्षा करावी लागत नाही.
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये मृतांचा आकडा वाढला होता. जिल्हाभरातून रुग्ण उपचारासाठी नगर शहरात दाखल होत होते. त्यामुळे मृत्यूंचे प्रमाणही वाढलेले होते. अमरधाम येथील स्मशानभूमीत दररोज १० ते १५ जणांवर अंत्यसंस्कार केले जात होते. हा आकडा जानेवारी ते फेब्रुवारी २०२१मध्ये कमी झाला होता. परंतु, कोरोनाची दुसरी लाट येऊन धडकली आहे. जिल्हाभरातून रुग्ण उपचारासाठी नगर शहरातील खासगी व शासकीय रुग्णालयात दाखल होत असून, मृतांचा आकडा वाढून १२वर पोहोचला आहे. अमरधाम येथे दररोज ७ ते ८, तर दफनभूमीमध्ये ५ ते ६ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्हा शासकीय रुग्णालय व खासगी रुग्णालयातून फोन आल्यानंतर त्यांना वेळ दिली जाते. अमरधाममध्ये दोन विद्युत दहिन्या आहेत. या विद्युत दाहिन्यांची क्षमता प्रतिदिन २० इतकी आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले. शववाहिकेतून मृतदेह अमरधाम येथे आल्यानंतर नातेवाईकांना बाहेर थांबण्यास सांगून अंत्यविधी उरकला जातो. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी येथील कर्मचारी पीपीई कीट घालूनच अंत्यविधी करतात. स्वत:ची काळजी घेऊन अंत्यविधी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
..
मृतांची संख्या वाढल्याने शववाहिन्या वाढवणार
कोरोनाच्या दुसरी लाट सुरू झाली आहे. मृतांची संख्या वाढत असल्याने शववाहिनींची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या आरोग्य विभागाने सादर केला आहे. स्थायी समितीने खरेदीसाठी मान्यता दिली असून, लवकरच आणखी शववाहिनींची खरेदी केली जाणार आहे.
..
सूचना डमीचा विषय आहे.