शहीद जवानांच्या कुटुंबियांना साई संस्थातर्फे अडीच कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 08:21 PM2019-02-16T20:21:23+5:302019-02-16T20:21:31+5:30

जम्मू व काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये ४४ जवान शहीद झाले. या सर्व शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना देशभरातील सर्व साईभक्तांच्या व श्री साईबाबा संस्थानच्या वतीने एकूण २.५१ कोटी रुपयांची मदत निधी देणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी दिली.

25 crores fund by Sai Institute for martyrs' families | शहीद जवानांच्या कुटुंबियांना साई संस्थातर्फे अडीच कोटींचा निधी

शहीद जवानांच्या कुटुंबियांना साई संस्थातर्फे अडीच कोटींचा निधी

शिर्डी : जम्मू व काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये ४४ जवान शहीद झाले. या सर्व शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना देशभरातील सर्व साईभक्तांच्या व श्री साईबाबा संस्थानच्या वतीने एकूण २.५१ कोटी रुपयांची मदत निधी देणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी दिली.
जम्मू व काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये ४४ जवान शहीद झालेले आहेत. या घटनेचा सर्व स्तरातून संताप व निषेध व्यक्त केला जात आहे. या हल्ल्याला देशाचे सैन्य आणि शासन उत्तर देईलच, पण आपल्या संवेदना सर्व देशाने व्यक्त केलेल्या आहेत आणि त्या संवेदनाचा आदर श्री साईबाबा संस्थान करीत आहे. त्या संवेदना व्यक्त करुन या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना देशभरातील सर्व साईभक्तांच्या व श्री साईबाबा संस्थानच्या वतीने २.५१ कोटी रुपयांचा निधी देण्यासंदर्भात मी संस्थानच्या सर्व विश्वस्तांची चर्चा केली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयास व शासनाच्या परवानगीस अधिन राहून सदरचा निधी देण्यात येईल, असे ही डॉ.हावरे यांनी सांगितले.

 

Web Title: 25 crores fund by Sai Institute for martyrs' families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.