श्रीगोंदा तालुक्यातील २५ हेक्टर जंगल जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 07:27 PM2018-05-08T19:27:05+5:302018-05-08T19:28:19+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजा, कोथूळ या भागात विस्तारलेल्या जंगलात सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास आगीचा वनवा भडकला. यामध्ये सुमारे तीनशे एकर जंगल जळून खाक झाले. आगीचे कारण अद्याप समजले नाही.
श्रीगोंदा : तालुक्यातील ढोरजा, कोथूळ या भागात विस्तारलेल्या जंगलात सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास आगीचा वनवा भडकला. यामध्ये सुमारे तीनशे एकर जंगल जळून खाक झाले. आगीचे कारण अद्याप समजले नाही.
आगीची तीव्रता अधिक असल्याने नियंत्रण मिळवता आले नाही. दूरवर पसरत गेलेल्या या आगीत अंदाजे ३०० एकर क्षेत्रावरील शेकडो झाडे जळून खाक झाली. ससे, खोकड, उद मांजर, लांडगे, साप, सायाळ हे वन्यजीव मृत्यूमुखी पडले. याबाबत परिक्षेत्र वनाधिकारी वर्षा दिघे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, ‘‘मी बैठकीसाठी पुण्याला गेले होते. अद्याप घटनास्थळी भेट दिलेली नाही. घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केल्यानंतरच नुकसानीचा आकडा सांगता येईल.’’