पाथर्डीच्या २५ विद्यार्थ्यांना फार्मा कंपनीत नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:22 AM2021-09-27T04:22:36+5:302021-09-27T04:22:36+5:30

पाथर्डी : श्री आनंद महाविद्यालयात घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ग्रामीण भागातील २५ विद्यार्थांना हैदराबाद येथील अरबिन्दो फार्मा लिमिटेड या ...

25 Pathardi students get jobs in pharma company | पाथर्डीच्या २५ विद्यार्थ्यांना फार्मा कंपनीत नोकरी

पाथर्डीच्या २५ विद्यार्थ्यांना फार्मा कंपनीत नोकरी

पाथर्डी : श्री आनंद महाविद्यालयात घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ग्रामीण भागातील २५ विद्यार्थांना हैदराबाद येथील अरबिन्दो फार्मा लिमिटेड या कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. श्री आनंद महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागामार्फत कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले होते. यामध्ये ७० विद्यार्थी सहभागी झाले होते. अरबिन्दो फार्मा लिमिटेड या कंपनीचे प्रमुख एस. वेंकय्या, प्रवीणकुमार रेड्डी यांनी विद्यार्थ्यांची लेखी तसेच तोंडी परीक्षा घेतली. यामध्ये ज्यांनी ज्यादा गुण मिळविले त्यांची निवड करण्यात आली. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील विद्यार्थांना संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुलाखती घेताना कोरोना नियमांचे पालन करण्यात आले.

यशस्वीतेसाठी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मुक्तार शेख, संजय नरवडे, अनिल गंभीरे, बुथवेल पगारे, प्रतीक नागवडे, इस्माईल शेख, जयश्री खेडकर, प्रा. अरुण बोरुडे, अश्विनी थोरात आदींनी प्रयत्न केले.

निवड झालेल्या विद्यार्थांचे संस्थेचे सचिव सतीश गुगळे, विभागप्रमुख सुरेश कुचेरिया, प्राचार्य डॉ. शेषराव पवार आदींनी कौतुक केले.

---

श्री आनंद महाविद्यालय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवनवीन योजना राबवित असते. त्याचाच एक भाग म्हणून हे कॅम्पस इंटव्ह्यू घेण्यात आल्या. मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची निवड झाल्याचा आनंद आहे.

- डॉ. शेषराव पवार,

प्राचार्य, आनंद महाविद्यालय

-----

२६ पाथर्डी कॉलेज

हैदराबादच्या फार्मा कंपनीत निवड झालेले पाथर्डी येथील आनंद कॉलेजचे विद्यार्थी.

Web Title: 25 Pathardi students get jobs in pharma company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.