पीक विम्याची २५ टक्के आगाऊ रक्कम दिवाळीपूर्वी देणार - धनंजय मुंडे
By अण्णा नवथर | Published: October 7, 2023 02:50 PM2023-10-07T14:50:21+5:302023-10-07T14:50:45+5:30
शब्दगंध राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले.
अहमदनगर: राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी नेमलेल्या पिक विमा कंपन्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली या बैठकीत शेतकऱ्यांना २५ टक्के अकाउंट देण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिली जाईल,अशी घोषणा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अहमदनगर येथे शनिवारी केली.
शब्दगंध राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पीक विमा देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना पीक विमा वेळेवर मिळावा, यासाठी पिक विमा कंपन्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना २५ टक्के देण्याचे सांगण्यात आलेले आहेत त्यानुसार ही रक्कम दिली जाईल असे मुंडे म्हणाले.