अर्बन बँकेचा ठेवी वाढविण्यासाठी प्रयत्न -सुभाषचंद्र मिश्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 05:38 PM2019-09-27T17:38:02+5:302019-09-27T17:46:45+5:30

नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या आठशे कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी आतापर्यंत केवळ २४ कोटी रुपयांची थकबाकी वसुली झाली आहे. बँकेवर प्रशासक नियुक्त झाल्यानंतर इतर बँका व पतसंस्थांनी त्यांच्या अर्बन बँकेतील २५० कोटी रुपयांच्या ठेवी काढून घेतल्या आहेत.

250 crore deposits withdrawn from Urban Bank: Subhash Chandra Mishra | अर्बन बँकेचा ठेवी वाढविण्यासाठी प्रयत्न -सुभाषचंद्र मिश्रा

अर्बन बँकेचा ठेवी वाढविण्यासाठी प्रयत्न -सुभाषचंद्र मिश्रा

अहमदनगर : नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या आठशे कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी आतापर्यंत केवळ २४ कोटी रुपयांची थकबाकी वसुली झाली आहे. बँकेवर प्रशासक नियुक्त झाल्यानंतर इतर बँका व पतसंस्थांनी त्यांच्या अर्बन बँकेतील २५० कोटी रुपयांच्या ठेवी काढून घेतल्या असल्या तरी ८३ कोटींच्या नव्या ठेवी बँकेत जमा झाल्या आहेत.
बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनीच शुक्रवारी बँकेत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, बँकेचा २०० ते २५० कोटी रुपयांचा एनपीए होता. बँकेने १०० कोटी रुपये थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. त्यामध्ये २४ कोटी रुपयांची थकबाकी वसुली झाली आहे. राहिलेल्या वसुलीसाठी विशिष्ट वेळ नसली तरी लवकरात लवकर उद्दिष्टपूर्ती करू, असे मिश्रा म्हणाले. आतापर्यंत २० मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडे ६० कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यांच्याकडील वसुलीची प्रक्रिया सुरू आहे. थकबाकी वसुलीसाठी पाच पथके तैनात करण्यात आली आहेत.
बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळावर जबाबदारी निश्चित केल्यामुळेच रिझर्व्ह बँकेने त्यांना पदावरून दूर केले. मात्र त्यांनी नेमके काय केले, त्यांच्यावरील पुढील कारवाईबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे पाठविलेला नाही. बँकेत तात्पुरत्या स्वरुपात ज्या कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यांचा कालावधी संपताच त्यांना कामावरून कमी करण्यात येईल. कर्ज मंजुरीची प्रक्रिया नियमितपणे सुरू आहे. प्रशासक नियुक्त झाल्यानंतर ठेवीदार आणि सभासदांचा बँकेवरील विश्वास वाढत असल्यामुळेच आतापर्यंत ८१ कोटीच्या नव्या ठेवी बँकेत जमा झाल्याचेही मिश्रा यांनी सांगितले.

Web Title: 250 crore deposits withdrawn from Urban Bank: Subhash Chandra Mishra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.