क-हेटाकळीत २७ लाखांची हानी : १० शेतक-यांचा २५ एकर ऊस जळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 06:59 PM2019-01-22T18:59:02+5:302019-01-22T19:01:52+5:30
तालुक्यातील क-हेटाकळी शिवारात शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत ९ ते १० शेतक-यांचा सुमारे २५ एकर ऊस जळून अंदाजे २७ लाख रूपयांची हानी झाली.
शेवगाव : तालुक्यातील क-हेटाकळी शिवारात शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत ९ ते १० शेतक-यांचा सुमारे २५ एकर ऊस जळून अंदाजे २७ लाख रूपयांची हानी झाली. तलाठ्यांनी घटनेचा पंचनामा केला असून जिल्हाधिकाºयांना अहवाल सादर केल्याची माहिती तहसीलदार डॉ. विनोद भामरे यांनी दिली.
तालुक्यातील कºहेटाकळी येथे सोमवारी दुपारच्या सुमारास शेतकरी शेतात पाणी देत असताना उसाला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वाºयाच्या वेगामुळे काही वेळातच आगीने मोठा पेट घेऊन रूद्रावतार धारण केला. त्यामुळे शेतकºयांनी जवळच्या खानापूर येथे संपर्क साधून इतर शेतकºयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर तब्बल दोनशे ते तीनशे जणांनी आग विझविण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत पाच एकर परिसरातील उसाने पेट घेतला होता. ज्ञानेश्वर व गंगामाई कारखान्याच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले होते. हे अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने २० एकर परिसरातील उसाला घेरले होते. बंब जाण्यासाठी रस्त्याची अडचण निर्माण झाली. संध्याकाळी उशिरा आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. मात्र तोपर्यंत सुमारे २५ एकरातील ऊस जाळून खाक झाला होता.
या घटनेत कºहेटाकळी येथील जालिंदर कोठुळे, जालिंदर झिरपे, भारत गोबरे, आश्रू गोबरे, विष्णू कोठुळे, संभाजी काकडे, मीनाक्षी काकडे, संजीवनी गीते आदी शेतक-यांचा ऊस जळून खाक झाला.