नगरमध्ये मिळाली २८ शेतक-यांना कर्जमाफी; कर्जमाफीच्या याद्यांचा घोळ सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 04:58 PM2017-10-18T16:58:15+5:302017-10-18T17:03:13+5:30
अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत बुधवारी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात नगर जिल्ह्यातील ...
अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत बुधवारी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात नगर जिल्ह्यातील २८ शेतक-यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. हा कार्यक्रम झाल्यानंतरही कर्जमाफीच्या याद्यांचा घोळ मात्र सुरूच आहे.
या शेतक-यांचे कमीत कमी ८ हजार १५४ तर जास्तीत जास्त ५६ हजार ९७९ रूपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी दोन शेतक-यांना मुख्यमंत्र्यांच्या सहीचे कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. साडीचोळी, सदरा, पायजम्याचे कापड, लाडू, शेवचिवडा देऊन शेतकरी दांपत्यांचा सन्मान करण्यात आला. खासदार दिलीप गांधी, आमदार बाळासाहेब मुरकुटे, महापौर सुरेखा कदम, जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी विश्वजित माने आदी उपस्थित होते. जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी प्रास्ताविक केले. अहमदनगर जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी आभार मानले. यावेळी आ. मुरकुटे, महापौर कदम, जिल्हाधिकारी महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.
हे आहेत नगर जिल्ह्यातील २८ भाग्यवान शेतकरी
शकीला व मजनुभाई पीरमोहंमद शेख, सुमती व मधुकर पावलस जाधव (नगर तालुका), लताबाई व पाटीलबा पर्बत दिघे, सुमन व चंद्रभान मुरलीधर हासे (संगमनेर तालुका),रंजना व अण्णासाहेब मुक्ता हांडे, जयश्री व रमाजी केशू भोर (अकोले तालुका), चांगुना व मच्छिंद्र सखाराम पठारे, प्रतिभा व तुकाराम रामचंद्र अलभर (पारनेर तालुका), सुमन व पर्वती शिवराम जामले, सुनीता व संतोष तात्या खराडे (श्रीगोंदा), विठाबाई व संतराम गेणा मोरे, मंडाबाई व बाजीराव यादव सूर्यवंशी (कर्जत), अलका व दत्तात्रय मुरलीधर शेळके, सुवर्णा व धर्मा बाजीराव लेकुरवाळे (जामखेड), मातराबाई व धोंडीराम बन्सी पालवे, पद्मा व पोपट धोंडीबा कारखिले (पाथर्डी), लताबाई व राम भानुदास सोलाट, सुमन व अंबादास हरिभाऊ चेडे (शेवगाव), विमल व नामदेव निकम, राजसबाई व प्रकाश दिनकर करपे (नेवासा), मीरा व उल्हास भाऊसाहेब भवर, छाया व रवींद्र श्रीराम लगे (राहुरी), मिनाबाई व प्रभाकर दशरथ पेरणे, सुनीता व भीमराज राधाकिसन दौंड (श्रीरामपूर), संगीता व दिलीप मोहन कापसे, कमल व जालिंदर सजन वाणी (राहाता), विजया व सुरेश काशीनाथ लांडगे, जिजाबाई व त्रिंबक गोपाळ रणशूर (कोपरगाव).
कर्जमाफीसाठी राज्य सरकारने १३ हजार ८५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जिल्ह्याची अंतिम मंजूर (ग्रिन लिस्ट) यादी लवकरच प्रसिद्ध होईल. जिल्ह्यातील ३ लाख ७६ हजार लाभार्थी पात्र ठरले आहेत. सरकारने शब्द पाळून विरोधकांच्या टीका टिपण्णीस कृतीतून उत्तर देत त्यांचे तोंड बंद केले आहे.
प्रा. राम शिंदे, पालकमंत्री, अहमदनगर.