संजीवनी पॉलिटेक्निकच्या २८ विद्यार्थ्यांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:14 AM2021-06-11T04:14:33+5:302021-06-11T04:14:33+5:30
अमित कोल्हे : विद्यार्थी व पालकांची स्वप्नपूर्ती कोपरगाव : संजीवनी के.बी.पी. पाॅलिटेक्निक महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नामुळे दरसन ...
अमित कोल्हे : विद्यार्थी व पालकांची स्वप्नपूर्ती
कोपरगाव : संजीवनी के.बी.पी. पाॅलिटेक्निक महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नामुळे दरसन ऑटोमोटिव्ह टेक्नाॅलाॅजी अँड इंजिनिअरिंग या बहुराष्ट्रीय कंपनीने २८ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी आकर्षक पगारावर निवड केली आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली.
विद्यार्थी व पालकांनी मोठी स्वप्ने घेऊन संजीवनी पाॅलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतला होता. ती स्वप्ने विद्यार्थ्यांच्या अंतिम निकालाच्या अगोदरच संजीवनी पूर्ण करीत आहे, असे अमित कोल्हे यांनी म्हटले आहे.
संजीवनी पाॅलिटेक्निकमध्ये बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. कोविड संकटामुळे ग्रामीण अर्थकारणाचा कणा मोडकळीस आला आहे. अशा परिस्थितीत संजीवनीने अधिक नेटाने कार्य हाती घेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचे उत्तम परिणाम दिसून येत आहेत.
कंपनीने निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गौरव शेलार, राहुल अव्हाड, विवेक गिते, वेदांत क्षीरसागर, आदित्य माळवे, सुरज शिंदे, देवेन चोप्रा, यश परदेशी, रवी पगार, विकास ढाकणे, सचिन केकाण, अवधूत कापडी, अभिषेक लांडगे, संकेत पोळ, हितेश थोरात, प्रथमेश वाघ, गौतम जावळे, अमित गायकवाड, संदेश आगळे, सुमित पटाईत, विशाल बेलदार, सचिन पवार, किशोर गोरडे, शुभम बाचकर, प्रशांत शेलार, सत्यम बोरावके, अनिरुद्ध चव्हाण, अक्षदा वानखेडकर यांचा समावेश आहे.
माजी मंत्री व संजीवनी ग्रुप इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केेले आहे. प्राचार्य ए. आर. मिरीकर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आय. के. सय्यद यांचेही त्यांनी अभिनंदन केले.