मुळा धरणाचे ११ दरवाजे उघडले; नदीपात्रातील बंधारे भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 04:06 PM2019-10-22T16:06:51+5:302019-10-22T16:07:24+5:30
मुळा धरण पुन्हा १०० टक्के भरल्यानंतर मुळा धरणाचे ११ दरवाजे मंगळवारी उघडण्यात आले आहे़ नदीपात्रात १ हजार १०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ नदीतील डिग्रस येथील कोल्हापूर पध्दतीचा बंधार पूर्ण क्षमतेने भरला असून मानोरी बंधाºयात पाणी सोडले आहे.
राहुरी : मुळा धरण पुन्हा १०० टक्के भरल्यानंतर मुळा धरणाचे ११ दरवाजे मंगळवारी उघडण्यात आले आहे़ नदीपात्रात १ हजार १०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ नदीतील डिग्रस येथील कोल्हापूर पध्दतीचा बंधार पूर्ण क्षमतेने भरला असून मानोरी बंधाºयात पाणी सोडले आहे.
गेल्या पाच दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावली आहे़ त्यामुळे कोतूळ येथे पुन्हा ५०० क्युसेकने पाण्याची आवक धरणाकडे सुरू आहे़ याशिवाय पारनेर तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने मधल्या भागातील पाणी धरणाकडे येत आहे़ सोमवारी धरणातून सुरू असलेला पाण्याच विसर्ग ५०० क्युसेकवरून ११०० क्युसेक करण्यात आला आहे़ आजही पाणलोट क्षेत्रावर रिमझिम पावसाची हजेरी सुरू होती़ २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण असलेल्या मुळा धरणाच्या प्रत्येक मोरीव्दारे १०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरू झाल्यामुळे नदीकाठावरील शेतीला लाभदायक ठरणार आहे़ मुळा नदीवरील डिग्रस, मांजरी, मानोरी, वांजुळपोई हे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पूर्ण क्षमतेने भरणार आहेत़ त्यामुळे नदी काठी असलेल्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे़ मुळा नदीपात्रात असलेल्या बंधा-याच्या फळ्यातून पाण्याची गळती होणार तर नाही ना? याची शंका शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे़
मुळा धरणातून मंगळवारी नदीपात्रात विसर्ग ११०० क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे़ धरण पूर्ण क्षमतेने पुन्हा भरले आहे़ पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक सुरू आहे़ २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी कायम ठेवून नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येत आहे़ डाव्या अथव्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाण्याची मागणी करण्यात आलेली नाही़, असे मुळा धरण अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी सांगितले.