संगमनेरात नेपाळमधील तबलीक जमातीचे १४ जण; प्रशासनाने घेतले ताब्यात; मोमीनपु-यातील पाच जणांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 11:04 AM2020-04-03T11:04:14+5:302020-04-03T11:04:43+5:30
संगमनेर : लॉकडाऊन काळात नेपाळमधील तबलीक जमातीच्या १४ जणांना संगमेनरात वास्तव्यास ठेवणा-या शहरातील मोमीनपुरा येथील पाच जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुरूवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या १४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची वैद्यकीय तपासणी केली असून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी सांगितले.

हाजी जलीमखान कासामखान पठाण, हाजी शेख जियाऊद्दीन आमीन, जैनुद्दीन हुसेन परावे, हाजी इमाम जैनुद्दिन मोमीन, रिजवान गुलामनवी शेख (सर्व रा. मोमीनपुरा, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांनी नावे आहेत. त्यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस नाईक सलीम रमजान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांनी नेपाळमधील १४ जणांना शहरातील रहेमतनगर गल्ली क्रमांक दोन येथे ठेवले होते. तपास पोलीस कॉँस्टेबल रमेश लबडे करीत आहेत.