अकोले तालुक्यातील १५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू; कारण अज्ञात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 01:27 PM2020-04-14T13:27:19+5:302020-04-14T13:27:33+5:30
अहमदनगर: अकोले तालुक्यातील एका १५ वर्षीय मुलाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
अहमदनगर: अकोले तालुक्यातील एका १५ वर्षीय मुलाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
या मुलाच्या घशातील स्रावाचे नमुने सोमवारी घेण्यात आले असून ते तपासण्यासाठी पुण्याला पाठविण्यात आलेले आहेत. तो अहवाल अद्याप आलेला नाही. हा मुलगा ठाणे जिल्हयात शाळेला होता. २८ मार्चला तो अकोले तालुक्यात गावी आला होता. या मुलामध्ये कावेळी तसेच रक्ताक्षयाची लक्षणेही होती, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पुण्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल असे सूत्रांनी सांगितले.
अकोले तालुक्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा डोळ््यात तेल घालून काम करीत आहे. शेजारच्या संगमनेर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळूुन आल्याने पहिल्यापासूनच अकोले तालुक्यातील प्रशासनाने दक्षता घेतलेली आहे. मात्र एका मुलाच्या मृत्युमुळे तालुतक्यात चिंता व्यक्त झाली आहे.