एका दिवसात विना नंबरची ३० वाहने जप्त 

By अण्णा नवथर | Published: November 22, 2023 04:35 PM2023-11-22T16:35:07+5:302023-11-22T16:36:41+5:30

पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी शहरातील कोतवाली आणि तोफखाना पोलिसांना विनानंबरच्या वाहनांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.

30 numberless vehicles seized in one day | एका दिवसात विना नंबरची ३० वाहने जप्त 

एका दिवसात विना नंबरची ३० वाहने जप्त 

अहमदनगर: सराईत गुन्हेगार गुन्हा करताना विना नंबरची वाहने वापरतात. अशी नंबर नसलेली वाहने वापरून गुन्हे करणा्ऱ्यांची संख्या वाढली असून, नगर पोलिसांनी नाकाबंदी करत नंबर नसलेली ३० वाहने जप्त केली आहेत. मुळ कागपदपत्रे आणून दिल्यानंतरच वाहने दिले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
 
शहरात गुन्हेगारी वाढली आहे. चैन स्नॅचिंग,घरफोडी, महिला व मुलींची छेड, यासारख्या घटना घडत आहेत. अशा गुन्ह्यांत विना नंबरची वाहने वापरली जात असल्याचे उघड झाले आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी शहरातील कोतवाली व तोफखाना पोलिसांना विना नंबरच्या वाहनांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तोफखाना पोलिसांनी १५ वाहने जप्त केली असून, कोतवाली पोलिसांनी १५ वाहने जप्त केली आहेत. त्यामुळे वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेली वाहने परत आणण्यासाठी बुधवारी दुचाकी मालकांनी एकच गर्दी केली होती.

Web Title: 30 numberless vehicles seized in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.