अकोेले तालुक्यात ३०० घरकुले पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:23 AM2021-03-01T04:23:09+5:302021-03-01T04:23:09+5:30
अकोले : तालुक्यातील घरकुले ५१६ पैकी ३०० पूर्ण झाली आहेत. उर्वरित घरकुलांची बांधकामे सुरू असल्याने तेही दोन आठवड्यात पूर्ण ...
अकोले : तालुक्यातील घरकुले ५१६ पैकी ३०० पूर्ण झाली आहेत. उर्वरित घरकुलांची बांधकामे सुरू असल्याने तेही दोन आठवड्यात पूर्ण होतील. लाभधारकांना त्याचा ताबा लवकरच मिळणार असल्याची माहिती अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांनी दिली.
प्रत्येक घरकुल लाभार्थ्यास १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान मिळत असते. पंचायत समितीस्तरावर घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी स्टील, सिमेंट, शौचालय भांडे, फरशी, विटा आदी वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी राजूर येथे गणेश स्वयंसाहाय्यता महिला बचतगट सरसावला आहे. यामुळे या बचतगटाचे आर्थिक उपन्न वाढीसाठी हातभार लागणार आहे. तालुक्यात घरकुलांचे बांधकाम मोठ्या प्रगतिपथावर असून घरकुल लाभार्थ्यास घरकुल कसे बांधावे, यासाठी घरकुल डेमो हाऊस दाखविण्यात येत आहे. घरकुल लाभार्थ्याचे घरकुल पूर्ण झाल्यावर ज्यांना गॅस कनेक्शन नाही, अशांना उज्ज्वला गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे. सौभाग्यवती योजनेमार्फत घरकुलधारकास मोफत वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन देण्यात येणार आहे. तर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. नरेगाअंतर्गत रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यास सर्व सुखसुविधा शासन स्तरावर उपलब्ध होणार असल्याने घरकुल योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांनी केले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना २०१९-२१ पर्यंत मंजूर असलेले घरकुल १,८९८ आहेत. घरकुल लाभार्थ्यांना पहिला, दुसरा काहींना तिसरा हप्ताही देण्यात आला आहे. तर रमाई आवास योजनेंतर्गत १५० घरकुल मंजूर आहेत. त्यापैकी घरकुल लाभार्थ्यास एक ते चारही हप्ते देण्यात आले आहेत. तर शबरी आवास योजना अंतर्गत ५७४ घरकुले मंजूर आहेत. तर ३४१ लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे, अशी अकोले तालुक्यातील घरकुलांची परस्थिती आहे.
....
घरकुल लाभार्थ्यांनी घरकुलांची कामे दर्जात्मक करावी. घरकुल संदर्भात काही तक्रार असल्यास लाभधारकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा.
- एकनाथ चौधरी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अकोले.