तीन ट्रकमधून पुन्हा ३०० लिटर डिझेलची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:20 AM2021-03-25T04:20:16+5:302021-03-25T04:20:16+5:30

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील समर्थ पेट्रोल पंपावर उभ्या केलेल्या मालवाहू ट्रकमधून ३०० लिटर डिझेल चोरीची ...

300 liters of diesel stolen from three trucks again | तीन ट्रकमधून पुन्हा ३०० लिटर डिझेलची चोरी

तीन ट्रकमधून पुन्हा ३०० लिटर डिझेलची चोरी

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील समर्थ पेट्रोल पंपावर उभ्या केलेल्या मालवाहू ट्रकमधून ३०० लिटर डिझेल चोरीची घटना नुकतीच घडली. यानंतर दोन दिवसांनी गावानजीकच्या एका पेट्रोल पंपावर रात्रीच्या सुमारास उभ्या केलेल्या तीन मालवाहू ट्रकमधून चोरट्यांनी पुन्हा ३०० लिटर डिझेलची चोरी केली. बुधवारी (दि. २४ ) सकाळी सहा वाजेच्या सुमारास डिझेल चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.

लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर तळेगाव दिघे गावानजीक तिरुपती बालाजी पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर रात्रीच्यावेळी चालक सोमनाथ सज्जन गिड्डे (ट्रक क्रमांक एम.एच.-२४, ए.बी.-७५७६ ), चालक चांगदेव हरिबा सुर्वे (ट्रक क्रमांक एम.एच.-१३, ए.एक्स.-२३०५ दोघेही रा.मोडनिंब, ता.माढा, जि.सोलापूर), चालक दिलदार जब्बार (ट्रक क्रमांक ए.पी.-०४, वाय २८६९, रा.तुंकूर, कर्नाटक ) यांनी त्यांच्या ताब्यातील ट्रक रात्रीच्यावेळी उभ्या केलेल्या होत्या. चालक व क्लिनर ट्रकमध्येच झोपलेले होते. दरम्यान मध्यरात्रीनंतर एक ते तीनच्या सुमारास चोरट्यांनी तिनही ट्रकच्या इंधन टाक्यांची झाकणे तोडून पहिल्या ट्रकमधून १७० लिटर दुसऱ्या ट्रकमधून ९० लिटर, तर तिसऱ्या ट्रकमधून ५० लिटर डिझेलची चोरी केली. डिझेल चोरीसाठी चोरटे चारचाकी वाहन, टिल्लू मोटर व पाईपचा वापर करतात. सोमवारी (दि.२२ ) रात्री गावानजीकच्या समर्थ पेट्रोल पंपावर उभ्या केलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी ३०० लिटर डिझेल चोरी केल्याची घटना ताजी असताना चोरट्यांनी पुन्हा तिरुपती बालाजी पेट्रोल पंपावर उभ्या केलेल्या तीन ट्रकमधून ३०० लिटर डिझेलची चोरी झाली. त्यामुळे तळेगाव दिघे परिसरात डिझेल चोरांचे मोठे रॅकेट असल्याचे उघड होत आहे. मालवाहू ट्रक चालक दूरचे असल्याने सहसा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली जात नाही. त्यामुळे डिझेल चोरांचे अधिकच फावत आहे. तळेगाव दिघे येथील पेट्रोल पंपावर उभ्या केलेल्या ट्रकमधून वारंवार डिझेल चोरीच्या घटना घडत आहे. या घटनेने डिझेल चोरांचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे आता उघड होत आहे. पोलिसांनी डिझेल चोरांच्या रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी मागणी ट्रक चालकांकडून होत आहे.

..

फोटो-२४तळेगाव डिझेल टाकी

..

तळेगाव दिघे येथील पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी उभ्या केलेल्या ट्रकच्या इंधन टाक्यांची चोरट्यांनी अशी झाकणे तोडून डिझेल चोरी केली.

Web Title: 300 liters of diesel stolen from three trucks again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.