शेवगावच्या २१ प्रभागांत ३१ हजार मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:22 AM2021-02-16T04:22:51+5:302021-02-16T04:22:51+5:30

शेवगाव : निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार शेवगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रशासनाने सोमवारी प्रसिद्ध केली. २१ प्रभागांतील ...

31 thousand voters in 21 wards of Shevgaon | शेवगावच्या २१ प्रभागांत ३१ हजार मतदार

शेवगावच्या २१ प्रभागांत ३१ हजार मतदार

शेवगाव : निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार शेवगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रशासनाने सोमवारी प्रसिद्ध केली. २१ प्रभागांतील ३१ हजार ४५० मतदारांच्या नावाचा यादीत समावेश केल्याची माहिती मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी दिली.

मतदार यादीत ३१ हजार ४५० मतदारांच्या नावाचा समावेश करण्यात आला असून, त्यात १६ हजार ०८३ पुरुष, तर १५ हजार ३६७ महिला मतदार आहेत. १५ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत प्रारूप मतदार यादींवर हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. १ मार्चला अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रामाणित करून प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. ८ मार्चला मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्याच दिवशी मतदान केंद्र निहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

प्रभागनिहाय मतदार संख्या अशी : प्रभाग क्रमांक व कंसात एकूण मतदार संख्या - प्रभाग १ (१,३६९), २ (९४७), ३ (९८६), ४ (१,२८५), ५ (१,३३४), ६ (२,१४४), ७ (१,५९०), ८ (१,५६१), ९ (१,१६१), १० (१,६६७), ११ (१,६९८), १२ (१,२६५), १३ (१,६९५), १४ (१,३२९), १५ (१,४१९), १६ (२,२६६), १७ (२,०९४), १८ (१,८६९), १९ (१,६५७), २० (१,०५५), २१(१,०५६).

Web Title: 31 thousand voters in 21 wards of Shevgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.