खर्डा येथील भूईकोट किल्ल्यात सापडले ३११ तोफगोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:52 PM2021-02-05T16:52:29+5:302021-02-05T16:53:25+5:30
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भूईकोट किल्ल्याची दुरुस्ती, मजबुतीकरण, सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. यानिमित्त पुरातत्त्व विभागाच्या वतीने किल्ल्यामध्ये उत्खनन करत असताना एका खड्ड्यामध्ये जवळपास ३११ तोफगोळे सापडले.
खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भूईकोट किल्ल्याची दुरुस्ती, मजबुतीकरण, सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. यानिमित्त पुरातत्त्व विभागाच्या वतीने किल्ल्यामध्ये उत्खनन करत असताना एका खड्ड्यामध्ये जवळपास ३११ तोफगोळे सापडले.
१७९५ साली येथे झालेल्या मराठा आणि निजाम यांच्या लढाईत येथील तोफगोळ्यांचा उपयोग झाला असण्याची शक्यता इतिहासतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
विशेषत: इसवी सन १७९५ निजाम आणि मराठे यांच्या युद्धामध्ये तत्कालीन तोफखान्याचा प्रमुख यांनी या तोफगोळ्यांचा वापर केला होता. या लढाईचे ऐतिहासिक पुरावे आजही किल्ला परिसरात सापडतात.