कोपरगावात बोगस बियाणांच्या ३११ तक्रारी; कृषी विभागाकडे मागितली दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 04:02 PM2020-07-31T16:02:47+5:302020-07-31T16:03:11+5:30

कोपरगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनच्या व बाजरीच्या बोगस बियाणामुळे शेतक-यांना दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागला.

311 complaints of bogus seeds in Kopargaon; Daad requested from the Department of Agriculture | कोपरगावात बोगस बियाणांच्या ३११ तक्रारी; कृषी विभागाकडे मागितली दाद

कोपरगावात बोगस बियाणांच्या ३११ तक्रारी; कृषी विभागाकडे मागितली दाद

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनच्या व बाजरीच्या बोगस बियाणामुळे शेतक-यांना दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागला.

तालुक्यात यंदाच्या खरिपात जून, जुलै महिन्यात सोयाबीन व बाजरीच्या बोगस बियाण्यासंदर्भात ३११ शेतकºयांनी कोपरगाव तालुका कृषी विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. कृषी विभागाच्या अधिका-यांनी प्रत्यक्षात तक्रारदार शेतक-यांच्या शेतावर जाऊन पाहणी करून पंचनामा केला. त्यानुसार १५९ शेतकºयांना बियाण्याचा मोबदला मिळाला आहे. तर उर्वरित १५२ शेतक-यांचे अहवाल प्रक्रियेत आहेत. 

शेतक-यांची सोयाबीनच्या बियाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी कंपन्याविरुध्द कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पेरणी केल्यानंतर सोयाबीन बियाणे उगवण न झाल्याच्या तालुक्यातील ३११ शेतकºयांच्या तक्रारी आल्या होत्या. सर्व तक्रारींची प्रत्यक्षात पाहाणी झाली आहे.  १५९ शेतक-यांना बियाणे मोबदला मिळाला आहे. उर्वरित १५२ शेतकºयांचे अहवाल प्रक्रियेत आहेत, असे तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी सांगितले.  
 

Web Title: 311 complaints of bogus seeds in Kopargaon; Daad requested from the Department of Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.