ट्रक-बस अपघातात ३४ प्रवासी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 11:25 AM2021-02-26T11:25:11+5:302021-02-26T11:27:06+5:30

श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव शिवारात ट्रकने बसला पाठिमागून दिलेल्या अपघातात  दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. परंतु अपघातात सुदैवाने कोणाही जखमी झाले नाही. हा अपघात गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला,

34 passengers rescued in truck-bus accident | ट्रक-बस अपघातात ३४ प्रवासी बचावले

ट्रक-बस अपघातात ३४ प्रवासी बचावले

घारगाव : श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव शिवारात ट्रकने बसला पाठिमागून दिलेल्या अपघातात  दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. परंतु अपघातात सुदैवाने कोणाही जखमी झाले नाही. हा अपघात गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला,

   यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार घारगाव परिसरात बस स्टँडनजीक नगर-दौंड रोडवर  ट्रक क्र. एम.एच.-१८,  ९४१७ याने पाठीमागून  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक एम.एच. ०६, एस-८०७० ला जोराची धडक दिली. सदरील ट्रक हा गव्हाचे पोते घेऊन मिरज (जि. सांगली) येथे चालला होता. सदरील बस ही फलटण डेपोची असून  मलकापूरवरून फलटणकडे निघाली होती.

 घारगाव येथे ट्रकने पाठीमागून दिलेल्या धडकेमुळे दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बस चालक कुमार चव्हाण व वाहक विकास राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार बसमध्ये ३४ प्रवासी होते. सर्वजण बालंबाल बचावले. ट्रकचालक दारियत्व सोलंकी व वाहक दिलीप सोलंकी हेही थोडक्यात बचावले.

Web Title: 34 passengers rescued in truck-bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.