३४३ कोरोना बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:25 AM2021-07-07T04:25:39+5:302021-07-07T04:25:39+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात सोमवारी २२६ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ...

343 corona infestations | ३४३ कोरोना बाधितांची भर

३४३ कोरोना बाधितांची भर

अहमदनगर : जिल्ह्यात सोमवारी २२६ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७३ हजार ६२८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०१ टक्के इतके झाले आहे. जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत ३४३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ४९१ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १३६ आणि अँटिजन चाचणीत १९२ रुग्ण बाधित आढळले. श्रीरामपूर, संगमनेर, शेवगाव, नगर तालुका, कोपरगाव, राहाता, अकोले या तालुक्यात सरासरी ७ ते १५ रुग्ण आढळून आले आहेत. तर राहुरी, नगर शहर, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, नेवासा, पाथर्डी, पारनेर या तालुक्यात रुग्णांची संख्या २० च्यावर आहे. पारनेर तालुक्यातील रुग्णसंख्या ५७ इतकी आहे.

Web Title: 343 corona infestations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.