लोकमतचा ३४ वा वर्धापनदिन : पालकमंत्री हसन मुश्रिफ यांच्या हस्ते विशेषांकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 10:35 AM2021-08-15T10:35:50+5:302021-08-15T10:36:41+5:30
अहमदनगर : लोकमत च्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त "ज्ञानदीप लावू जगी" या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन राज्याचे ग्रामविकास व ...
अहमदनगर : लोकमत च्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त "ज्ञानदीप लावू जगी" या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लोकमत भवनमध्ये झाले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, आमदार संग्राम जगताप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
"लोकमत"च्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी स्नेहमेळावा आयोजित केला जातो. यंदा कोरोनामुळे हा सोहळा रद्द करण्यात आला आहे. दरवर्षीची विशेष अंक प्रसिद्ध करण्याची परंपरा याहीवर्षी "लोकमत"ने कायम राखली आहे. जिल्ह्यातील संत परंपरेचा समृद्ध वारसा यंदा विशेष अंकातून उलगडला आहे. या विशंष अंकाचे प्रकाशन पालकमंत्री हसन मुश्रिफ यांच्या हस्ते झाले.
लोकमतचे अहमदनगर आवृत्ती प्रमुख सुधीर लंके, उपसरव्यवस्थापक नरेंद अंकुश यांनी पालकमंत्री हसन मुश्रिफ यांचे स्वागत केले.
----
पालकमंत्र्यांच्या राजेंद्र दर्डा
यांना शुभेच्छा
पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी "लोकमत"चे एडिटर इन चिफ तथा माजी मंत्री राजेंद्र दर्डा उर्फ बाबुजी यांना मोबाईलवरून शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, "लोकमत"ने विशेष अंकाची जपलेली परंपरा कौतुकास्पद आहे. "लोकमत"च्या वाटचालीसाठी शुभेच्छा. यावेळी त्यांनी लोकमत अहमदनगर कार्यालयातील सर्व कर्मचा-यांनाही शुभेच्छा दिल्या.
छावणी परिषदेचे सीईओ विद्याधर पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी लोकमत भवनला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
-----
स्नेहमेळावा रद्द
दरवर्षी होणारा स्नेह मेळावा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे, याची "लोकमत"चे वाचक, जाहिरातदार, विक्रेते, हितचिंतक यांनी कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.