नेवासा तालुक्यातील १३ गावात ३५ कोरोना पॉझिटिव्ह आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 12:13 PM2020-08-30T12:13:39+5:302020-08-30T12:14:31+5:30
नेवासा तालुक्यातील कोरोना बंधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण संख्येने सातशेचा आकडा पार गेला आहे. शनिवारी दिवसभरात तालुक्यातील १३ गावांमध्ये ३५ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
नेवासा : तालुक्यातील कोरोना बंधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण संख्येने सातशेचा आकडा पार गेला आहे. शनिवारी दिवसभरात तालुक्यातील १३ गावांमध्ये ३५ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
जुलै महिन्याच्या सुरवातीला तालुक्यात अवघे आठ रुग्ण संख्या होते. परंतु जुलै व आॅगस्ट महिन्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत ७१४ इतकी झाली. त्यात तालुक्यातील १४ कोरोना बाधितांनी आपला जीव गमावला.
शनिवारी २९ आॅगस्ट रोजी तालुक्यात ३५ रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालय अहवाल, रॅपिड अँटिजेन टेस्ट व खाजगी रुग्णालय अहवालाचा समावेश आहे. तालुक्यातील सोनई येथील १२, नेवासा शहरात ८, खामगाव नं २ मध्ये २, गेवराई २, शिंगणापूर २, मोरेचिंचोरे २, तर बेलपिंपळगाव, पानसवाडी, चांदा, तामसवाडी, घोडेगाव, म्हसले, बेल्हेकरवाडी येथील प्रत्येकी एक व्यक्ती कोरोनाबाधीत आढळला आहे.
तालुक्यातील रुग्ण संख्या ७१४ वर गेली असली तरी शनिवारी १० व्यक्तींना डिस्चार्ज दिल्याने ५६९ कोरोनामुक्त झाले आहेत. १३१ कोरोना बाधीत व्यक्ती उपचार घेत आहे.