रब्बीच्या ३६ टक्के पेरण्या पूर्ण

By | Published: December 5, 2020 04:33 AM2020-12-05T04:33:53+5:302020-12-05T04:33:53+5:30

ज्वारीचे सरासरी पेरणी क्षेत्र हे ४ लाख ७७ हजार आहे. यासह गहू आणि हरभरा या रब्बीच्या पिकांचीही मोठ्या प्रमाणात ...

36% of rabbi's sowing completed | रब्बीच्या ३६ टक्के पेरण्या पूर्ण

रब्बीच्या ३६ टक्के पेरण्या पूर्ण

ज्वारीचे सरासरी पेरणी क्षेत्र हे ४ लाख ७७ हजार आहे. यासह गहू आणि हरभरा या रब्बीच्या पिकांचीही मोठ्या प्रमाणात पेरणी होते; परंतु सध्या थंडीचे प्रमाण कमी असल्याने गहू आणि हरभरा पिकांच्या पेरण्या उशिरा होत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १९ हजार १६२ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली असून, ४० हजार ८१० क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी झालेली आहे. याशिवाय उसाची लागवडही ४२ हजार हेक्टरच्या पुढे आहे. चारा पिकेही २६ हजार हेक्टरवर आहेत. यंदा कांद्याला समाधानकारक भाव असल्याने कांदा पिकाची लागवडही मोठ्या प्रमाणात होत आहे. आतापर्यंत ५७ हजार ८४५ हेक्टरवर कांदा पिकाची लागवड झाली आहे.

.............

जिल्ह्यातील पीकनिहाय पेरणी

ज्वारी - १ लाख ९१ हजार हेक्टर, गहू १९ हजार १६२ हेक्टर, मका ६ हजार १२१ हेक्टर, हरभरा ४० हजार ८१० हेक्टर, करडई ६३, तीळ ३१, जवस २८, सूर्यफूल १०, फळपिके २ हजार ९८२, फुलपिके ३७५, मसाला पिके ७७ आणि भाजीपाला पिके ६ हजार ६५७, असे आहेत.

Web Title: 36% of rabbi's sowing completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.