संगमनेरात ३९ गोवंश जनावरांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 08:06 PM2020-08-23T20:06:35+5:302020-08-23T20:07:04+5:30
कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या ३९ गोवंश जनावरांना शहर पोलिसांनी जीवदान दिले. शनिवारी ( २२ आॅगस्ट) रात्री साडेनऊच्या सुमारास शहरातील जमजम कॉलनी परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी रविवारी एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर : कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या ३९ गोवंश जनावरांना शहर पोलिसांनी जीवदान दिले. शनिवारी ( २२ आॅगस्ट) रात्री साडेनऊच्या सुमारास शहरातील जमजम कॉलनी परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी रविवारी एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अब्दुल वाहिद अब्दुल करीम कुरेशी ( रा. भारत नगर संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलीस कॉन्स्टेबल सचिन कचरू उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांंनी ही कारवाई केली. ही जनावरे पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना गोशाळेत पाठवले.