मुळा धरणात ३९ टक्के पाणीसाठा; पाणलोटात पावसाची हजेरी , उजव्या कालव्यातून पाणी सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 01:03 PM2020-07-24T13:03:11+5:302020-07-24T13:03:23+5:30
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसापासून पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे २६ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या ९८९८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा जमा झाला आहे. धरण ३८.६० टक्के टक्के भरले आहे.
राहुरी : मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसापासून पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे २६ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या ९८९८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा जमा झाला आहे. धरण ३८.६० टक्के टक्के भरले आहे.
उपयुक्त पाणीसाठा ५३९८ दशलक्ष घनफूट २५.१० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. कोतूळ येथे ते ३३ मिलिमीटर तर मुळानगर येथे ६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मुळा धरणाकडे कोतूळ येथून १८७३ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या बारा तासात धरणात ४५९ दशलक्ष घनफूट नव्याने पाणी जमा झाले. आहे यंदाच्या पावसाळ्यात ३४०८ दशलक्ष घनफूट नावाने पावसाचे पाणी आले आहे. मुळा धरणाच्या पाणलोट व लाभक्षेत्रावर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वगार्तून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मुळा धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून ५५१ क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.