राळेगण म्हसोबा येथील रस्त्याच्या कामासाठी पावणे चार कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 03:33 PM2019-02-17T15:33:32+5:302019-02-17T15:33:49+5:30
राळेगण म्हसोबा येथे धनगरवाडी ते वडगांव तांदळी, वडगांव तांदळी ते साकत या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार राहुल जगताप यांच्या हस्ते करण्यात काल करण्यात आला.
वाळकी : राळेगण म्हसोबा येथे धनगरवाडी ते वडगांव तांदळी, वडगांव तांदळी ते साकत या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार राहुल जगताप यांच्या हस्ते करण्यात काल करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शिवाजी कर्डीले होते.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याच्या कामासाठी ३ कोटी ७० लाख ५४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. आठ किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे.
आमदार जगताप म्हणाले, चालू वर्षी दुष्काळ फार मोठा आहे. सर्वांनी ही परिस्थिती गांभीर्यांने घ्यावी. लवकरच छावण्या देखील सुरु करणार आहे. साकळाई योजनेचा देखील पाठपुरावा चालू आहे. आमदार कर्डिले म्हणाले, कामे चांगले करुन घ्या, कामांना निधी कमी पडू देणार नाही, असे मत व्यक्त केले.
यावेळी मार्केट कमिटी उपसभापती रेवणनाथ चोभे, अभिलाष पाटील, बाळासाहेब मेटे, दादासाहेब दरेकर, शरद बोठे, संतोष म्हस्के, बबन पडोळकर, दादाभाऊ चितळकर, दिलीप भालसिंग, सरपंच सुधीर भापकर, निलेश साळवे, भाऊसाहेब साळवे, प्रशांत कुलांगे, अनिल ठोंबरे, श्रीकांत जगदाळे, विकास बोरुडे, बाळासाहेब उगले, संजुकाका मंहाडुळे, बबन हराळ, सुभाष काळोखे, प्रभाकर भांबरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चेअरमन रविंद्र पिंपळे व बाळासाहेब पिंपळे यांनी केले. खुप दिवसा पासून हे काम रखडले होते परंतु आमदार राहुलदादा जगताप यांनी ग्रामस्थाना दिलेला शब्द पाळत रास्त्याचे काम मार्गी लावले. आमदार राहुलदादा यांचे काम चांगले असून यापुढे देखील त्यांनी काम करत रहावे, आम्ही सर्व त्यांच्याबरोबर आहोत. सर्व ग्रामस्थानच्या वतीने संतोष भापकर यांनी आभार मानले.