तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ४ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:20 AM2021-05-16T04:20:26+5:302021-05-16T04:20:26+5:30

तळेगाव दिघे : तळेगाव दिघे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीकरिता ४ कोटी ४३ लाख ४४ हजार रुपयांचा निधी मंजूर ...

4 crore for Talegaon Primary Health Center | तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ४ कोटी

तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ४ कोटी

तळेगाव दिघे : तळेगाव दिघे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीकरिता ४ कोटी ४३ लाख ४४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून महत्त्वाचा विषय मार्गी लागल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील यांनी दिली आहे.

ते म्हणाले, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे राज्य पातळीवर महसूल विभागाची जबाबदारी अत्यंत सक्षमपणे सांभाळत आहे. कोरोना संकटात राज्याबरोबर अहमदनगर जिल्ह्याचा व संगमनेर तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन ही कोरोना वाढ रोखण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. सर्वत्र कोरोना संकट असतानाही तालुक्यातील विकास कामांचा वेग कायम राखताना इंद्रजीत थोरात व यशोधन कार्यालय यांच्या सततच्या पाठपुराव्याच्या सहकार्यातून विविध वाड्या-वस्त्या, आदिवासी, दलित वस्त्या यासाठी यांच्या विकास कामांसाठी मोठा निधी मिळवला आहे.

जिल्हा परिषद वार्षिक योजना २०२०-२१ अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारत बांधकामासाठी चार कोटी ४३ लाख ४४ हजार रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. यामुळे तळेगाव येथील जुन्या इमारतीच्या शेजारी नवी भव्य प्रशस्त इमारत होणार असून या इमारतीतील सर्व कर्मचारी, अद्ययावत यंत्रणा, स्वतंत्र वॉर्ड व्यवस्था, अतिदक्षता विभाग, पार्किंगसह सुशोभीकरण केले जाणार आहे.

Web Title: 4 crore for Talegaon Primary Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.