नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी ४० कोटी मिळणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 10:08 PM2020-09-23T22:08:00+5:302020-09-23T22:08:32+5:30

अहमदनगर : नगर- मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी तातडीने ४० कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ...

40 crore for repair of Nagar-Manmad highway | नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी ४० कोटी मिळणार 

नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी ४० कोटी मिळणार 


अहमदनगर : नगर- मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी तातडीने ४० कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी दिले़ तसेच महामार्गाच्या मजबुतीकरण व रुंदीकरणाचा प्रस्ताव नव्याने तयार करण्याच्या सूचनाही चव्हाण यांनी केल्या आहेत़.


माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी नगर- मनमाड महामार्गातील खड्ड्यांचे फोटो व व्हिडिओ चित्रीकरणाच्या सीडी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना पाठविल्या होत्या़ दुरुस्तीबाबत सरकारने निर्णय न घेतल्यास कोणत्याहीक्षणी आंदोलन करण्याचा इशारा विखे यांनी दिला होता़  

या पार्श्वभूमीवर मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रालयात माजीमंत्री विखे यांच्या उपस्थितीत बांधकाम विभागाचे सचिव व प्रमुख अधिकाºयांची बैठक घेतली़  बैठकीला जिल्ह्याचे पालक सचिव नितीन करीर,रस्ते विभागाचे सचिव  देबडवार, मुख्य अभियंता पद्माकर भोसले, अधीक्षक अभियंता  जे. डी. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र राजगुरू, उपअभियंता आऱ आऱ पाटील, अंकुश पालवे, एस. आर. वर्पे आदी उपस्थित होते़ रस्त्याची वस्तुस्थिती चव्हाण यांनी जाणून घेत निधीचा आढावा घेतला़ यावेळी माजीमंत्री विखे पाटील यांनी या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे निर्माण झालेल्या अडचणींकडे चव्हाण यांचे लक्ष वेधले़ ते म्हणाले, नागरिकांची अडचण होत आहे़ वाहतूक तासनतास खोळंबते़ त्यामुळे अपघात होत असून, हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी आग्रही मागणी विखे यांनी यावेळी केली़ 
़़
महामार्गावरील ही कामे तातडीने करणार 
नगर- मनमाड महामार्गावरील कोल्हार आणि बाभळेश्वर  येथील पुलाचे चौपदरी करण करणे, पुणतांबा फाटा  आणि कोपरगाव येथे उड्डाणपुलाची कामे  पूर्ण करणे, रस्त्याच्या दुतर्फा साईड गटार, नागरी वस्ती असलेल्या भागात साईड पट्ट्यांचे काम पूर्ण करणे, ही कामे प्राधान्याने केली जाणार आहेत़
़़़
रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तीव्र संताप
नगर-मनमाड महामार्गावर जागोजागी प्रचंड खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणीही साचलेले आहे. अशा स्थितीत अहमदनगर ते शिर्डीपर्यंत जाणारे नागरिक या रस्त्याच्या दुरवस्थेवर तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. सध्या रस्त्यावरील खड्डे कधी बुजणार ? रस्ते दुरुस्ती कधी होणार? असे प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.

Web Title: 40 crore for repair of Nagar-Manmad highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.