४० कर्मचार्यांना पदोन्नती
By Admin | Published: May 19, 2014 11:42 PM2014-05-19T23:42:58+5:302024-06-29T13:07:08+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या ४० कर्मचार्यांना सोमवारी कालबध्द पदोन्नती देण्यात आली.
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या ४० कर्मचार्यांना सोमवारी कालबध्द पदोन्नती देण्यात आली. येत्या दोन दिवसांत आणखीन १२ कर्मचार्यांना पदोन्नती देण्यात येणार असून कृषी आणि पशू संवर्धन विभागातील ११ कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदेत शनिवार पासून बदल्याची प्रक्रिया सुरू आहे. महिला बालकल्याण विभागातील ४ कर्मचार्यांची बदली प्रक्रिया पार पडली असून सोमवारी कृषी विभागातील दोन कृषी अधिकार्यांची बदली झाली. यात एक प्रशासकीय आणि विनंती बदलीचा समावेश आहे. तसेच तीन विस्तार अधिकार्यांची विनंती बदली करण्यात आली आहे. पशूसंवर्धन विभागातील पशूधन विकास अधिकारी, पशूधन पर्यवेक्षक आणि वणोपचार या संवर्गातील प्रत्येकी दोन कर्मचार्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. दरम्यान, काल सकाळी मुख्यकार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत ४० कर्मचार्यांना कालबध्द पदोन्नती देण्यात आल्या. यात परिचरपदावर कार्यरत असणार्या ९ कर्मचार्यांना कनिष्ठ सहाय्यक लेखाधिकारी पदावर तर कनिष्ठ सहाय्यक पदावर काम करणार्या ३१ कर्मचार्यांना वरिष्ठ सहाय्यक यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी) ‘यथावकाश’ मुळे शिक्षकांमध्ये गोंधळ जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्यासंदर्भात १५ च्या शासन निर्णयात आधी कर्मचार्यांचे समायोजन, त्यानंतर पदोन्नती आणि यथावकाश बदल्या करण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत. यथावकाश शब्दामुळे कर्मचार्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. ही प्रक्रिया वर्षभर देखील सुरू राहू शकते असा तर्क अनेक शिक्षक उपस्थित करत असून शिक्षक संघटना देखील यासंदर्भात जिल्हा परिषदेत चौकशी करताना दिसत आहेत. १५० पटासाठी एक मुख्याध्यापक पदाला शिक्षण विभागाने परवानगी दिल्याने १९० अतिरिक्त मुख्याध्यापकांचा प्रश्न निकाली निघणार आहे. यामुळे नव्याने १४४ मुख्याध्यापकांची नव्याने पदांची निर्मिती होणार असून ३४ मुख्याध्यापक ३१ मे अखेर सेवानिवृत्त होत आहे. यामुळे अवघे २ मुख्याध्यापक अतिरिक्त राहणार आहेत. त्यांना देखील समवेत घेण्यात येणार आहे.